इयत्ता पाचवी व आठवीच्या परिक्षा पद्धतीत सुधारणा झालेली असून शासन निर्णय 2023 नुसार इयत्ता 5 वी व 8 वी परिक्षा केंद्र स्तरीय समिती | समितीची स्थापना करण्यात येते.. समिती कामे कोणती याविषयी माहिती आपण करून घेणार आहोत.
समिती रचना
इयत्ता पाचवी व आठवी परीक्षा सनियंत्रण समितीची रचना खालील प्रमाणे असते.
| केंद्र प्रमुख | अध्यक्ष |
|---|---|
| मुख्याध्यापक :1 | सदस्य |
| शिक्षक 2 | सदस्य |
| केंद्रीय मुख्याध्यापक | सचिव |
| एकूण | 5 |
समितीची कार्ये:-
- १) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती शासन निर्देशानुसार केंद्रस्तरावर नियोजन, प्रशिक्षण, सनियंत्रन व अंमलबजावणी करणे
- २) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती राबवून वर्षाखेरीस परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थी, उत्तीर्ण विद्यार्थी, अनुत्तीर्ण विद्यार्थी (परीक्षा, पुनर्परीक्षा) अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
- ३) अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन शाळास्तरावर योग्यप्रकारे अंमलबजावणी करणेबाबत सूचना देणे. ज्या शाळेमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थी असतील अशा शाळेमध्ये भेटी देणे.
- ४) आकारिक मूल्यमापनाच्या नोंदी, संकलित मूल्यमापन १, वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांची जिल्हास्तरीय समितीच्या सूचनेनुसार तालुक्यातील नमुना आधारित शाळा निवडून तपासणी करणे व जिल्हा समितीला अहवाल सादर करणे.
- ५) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी संकलित मूल्यमापन १, वर्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा, कॉपीमुक्त, निपक्षपातीपणे, पारदर्शी, भितीमुक्त, ताणमुक्त वातावरणात पार पडतील, यादृष्टीने आवश्यक सूचना निर्गमित करणे.पृष्ठ १४ पैकी १०शासन निर्णय क्रमांकः आरटीई २०२२/प्र.क्र. २७६/एस.डी-१
- ६) परीक्षा कालावधीत केंद्रस्तरीय भरारी पथक तयार करून शाळांना भेट देणे.
- ७) वरिष्ठ कार्यालयाकडून दिलेल्या दिनांकानुसार निकाल विद्यार्थी, पालक यांना काळविणेबाबत शाळांना कळविणे.
- ८) इयत्ता ५ वी व ८ वी संकलित मूल्यमापन १, वर्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा, या अनुषंगाने प्रती महिना समितीची बैठक आयोजित करणे.
- परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती – संपूर्ण मार्गदर्शक (2026)
- इयत्ता 5 वी व 8 वी परिक्षा केंद्र स्तरीय समिती | समितीची कामे | सदस्य |EDUCATION GR 2023
- इयत्ता 5 वी व 8 वी साठी नवीन परीक्षा पद्धती 2023 | Maharashtra GR Complete माहिती
- SEBC Certificate कसे काढावे? | संपूर्ण माहिती 2026 (Online + Offline Process)
- महागाई भत्ता (DA) थकबाकी 2026: नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 रक्कम कधी मिळणार? संपूर्ण माहिती