MAHATET 2025 अंतरिम निकाल जाहीर : पेपर 1 व 2 चा निकाल 16 जानेवारीपासून ऑनलाईन पाहता येणार

MAHATET 2025 अंतरिम निकाल जाहीर : पेपर 1 व 2 चा निकाल 16 जानेवारीपासून ऑनलाईन पाहता येणार

MAHATET 2025 अंतरिम निकालाबाबत महत्त्वाची बातमी

शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती.

MAHATET 2025 परीक्षेच्या पेपर क्र. १ व पेपर क्र. २ साठीची अंतिम उत्तरसूची दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

📌 MAHATET 2025 अंतरिम निकाल कधी जाहीर होणार?

पेपर क्र. १ व पेपर क्र. २ साठी प्रविष्ट झालेल्या सर्व उमेदवारांचा अंतरिम निकाल दिनांक १६/०१/२०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.

📝 गुणपडताळणी व आक्षेप नोंदणी प्रक्रिया

अंतरिम निकालाच्या अनुषंगाने उमेदवारांना गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा कोणतीही त्रुटी / आक्षेप असल्यास ते खालील कालावधीत ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येतील.

  • आक्षेप नोंदणी कालावधी : १६/०१/२०२६ ते २१/०१/२०२६
  • अंतिम वेळ : सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत
  • पद्धत : फक्त उमेदवार लॉगिनमधून ऑनलाईन

महत्त्वाची सूचना : इतर कोणत्याही मार्गाने (ऑफलाईन / ई-मेल / पोस्टाने) आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

🔔 उमेदवारांसाठी सूचना

सर्व संबंधित उमेदवारांनी आपला MAHATET 2025 अंतरिम निकाल वेळेत तपासावा आणि आवश्यक असल्यास दिलेल्या मुदतीत आक्षेप नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *