वाचन प्रेरणा दिनानिमित्त “ऑनलाईन माहितीपट स्पर्धा” , सविस्तर माहिती , नियम , कोण सहभागी होऊ शकतो ? अंतिम तारीख ……
बाराखडी संस्था विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी शिक्षणक्षेत्रात विविध उपक्रम राबवते. संस्थेकडून दरवर्षी “उत्सव कलाम” उपक्रम राबवला जातो. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या “वाचन प्रेरणा दिनाचं” औचित्य साधून हा उपक्रम योजला जातो. विद्यार्थांमध्ये वाचन तसेच संशोधनपर गुण वाढीस लागावे हा या उपक्रमाचा उद्देश. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असतानाचे उदाहरण समोर येत असतातच. पण याच दुधारी शस्त्राची दुसरी बाजू म्हणजे यंदा बाराखडीने “ऑनलाईन माहितीपट स्पर्धा” आयोजित केली आहे. फोनमध्येच व्हिडीओ शूट करून त्यावर पाच-सात मिनिटांचा व्हिडीओ तयार करण्याची ही स्पर्धा मनोरंजन आणि ज्ञानवर्धक आहे.
ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व अकरावी ते पदवी किंवा पदव्युत्तर अशा तीन गटांत होणार आहे.
- दैनंदिन जीवनात विज्ञानाचा होणारा वापर
- भारतीय विज्ञानाचा इतिहास
- माझा आवडता वैज्ञानिक,
- डिजिटल इंडिया,
- मियावाकी संकल्पना,
- वनहक्क कायदे,
- व्यक्तीपरिचय,
- पेट्रोल व विजेवर चालणारी वाहने आणि प्रदूषण,
- नमामि गंगे आणि
- जीडीपी
दिलेल्या विषयांपैकी कोणताही एक विषय निवडणे. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यांपैकी एका भाषेत व्हिडीओ तयार करून 8855865484 या क्रमांकावर व्हाट्सअप किंवा barakhadi01@gmail.com येथे ई-मेल करायचा आहे.
व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर आहे. विजेत्या स्पर्धकाला आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी.
अधिक माहितीकरिता 9673573148, 8855865484 या क्रमांकावर संपर्क साधा.
- महिला शिक्षण सेवकांना 180 दिवस प्रसूती रजा | प्रसूती रजेमुळे शिक्षण सेवक कालावधी वाढणार नाही | शासन शुद्धीपत्रक 2020 Prasuti Raja Gr
- निलंबित सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! 90 दिवसांत Charge-Sheet न दिल्यास काय?
- शाळेतील निरुपयोगी शैक्षणिक साहित्याचे निर्लेखन! 📚 | शिक्षक व शाळांसाठी महत्त्वाची माहिती 2026
- CTET 2026 – APPLICATION GUIDE – LAST DATE – APPLY NOW
- National Sports Day 2026: 28 ते 30 ऑगस्ट | Khelega Bharat Jeetega Bharat