MEDIUM OF SCHOLARSHIP EXAMINATION 2026 STD 4 & STD 7

MEDIUM OF SCHOLARSHIP EXAMINATION





शिष्यवृत्ती परीक्षा 2026 – परीक्षेचे माध्यम | Estudi.in


शिष्यवृत्ती परीक्षा 2026 – परीक्षेचे माध्यम (Std 4 & Std 7)

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यम उपलब्ध आहेत. योग्य माध्यमाची निवड विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी अत्यंत महत्वाची आहे. खाली तपशीलवार माहिती दिली आहे:MEDIUM OF SCHOLARSHIP EXAMINATION

MEDIUM OF SCHOLARSHIP EXAMINATION

परीक्षा सात माध्यमांमध्ये घेतली जाईल

  • मराठी
  • उर्दू
  • हिंदी
  • गुजराती
  • इंग्रजी
  • तेलुगु
  • कन्नड

सेमी-माध्यम पर्याय (मूळ + इंग्रजी)

  • मराठी + इंग्रजी
  • उर्दू + इंग्रजी
  • हिंदी + इंग्रजी
  • गुजराती + इंग्रजी
  • तेलुगु + इंग्रजी
  • कन्नड + इंग्रजी

महत्त्वाची सूचना

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Std 4) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Std 7) साठी सेमी इंग्रजी निवडलेल्या विद्यार्थ्यांना पेपर १ (गणित) व पेपर २ (बुद्धिमत्ता चाचणी) प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी दोन्ही माध्यमातून दिल्या जातील. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी माध्यमाची योग्य निवड करणे अत्यावश्यक आहे.

वेळेत तयारी करण्यासाठी व चुकांपासून वाचण्यासाठी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी माध्यम निवडताना दक्षता घ्यावी.

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.estudi.in

KALMAPAN SCHOLARSHIP

कालमापन : शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता पाचवी गणित

1 / 22

एक बस स्वारगेटहून सुटली आणि 2 तास 25 मिनिटे प्रवास करून साताऱ्याला अडीच वाजता पोहोचली, तर ती बस स्वारगेटहून किती वाजता निघाली ? (2018)

2 / 22

24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला व 16:45 वाजता संपला. सामना संपला त्या वेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील ? (2017)

3 / 22

थुबा अग्निबाण प्रक्षेपण केंद्रातून एक अग्निबाण एका सेकंदात 12 किमी या वेगाने जातो, तर तो अग्निबाण संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटे ते पावणेसहा या कालावधीत किती अंतर गेला असेल ?

4 / 22

एक गाडी मुंबईहून निघून पुणे येथे 4 तास 15 मिनिटांत पोहोचते. जर ती गाडी मध्यान्हपूर्व सव्वादहा वाजता निघाली असेल, तर ती गाडी पुण्यास किती वाजता पोहोचेल ?

5 / 22

एक गाडी नागपूर – अमरावती हे 150 किमी अंतर तीन तास पंधरा मिनिटांत पार करते, तर त्या गाडीला नागपूर – अकोला हे 250 किमी अंतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल ?
(2019)

6 / 22

पूनमने तिच्या गावी पोहोचण्यासाठी केलेल्या एकूण प्रवासापैकी 3 तास 55 मिनिटे बसने प्रवास केला व 4 तास 45 मिनिटे प्रवास आगगाडीने केला, तर तिने बसपेक्षा आगगाडीने किती काळ अधिक प्रवास केला ?

7 / 22

एका गावाहून एक बस 14:20 वाजता सुटली व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7:05 ला पोहोचली. तर या प्रवासास किती वेळ लागला ?

8 / 22

24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45 ला संपला, तर सामना 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला ? (2018)

9 / 22

मध्यान्हपूर्व 11 वाजून 45 मिनिटांनी सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 15 मिनिटे चालले, तर ते किती वाजता संपले ?

10 / 22

चिन्मयचा मध्यान्हपूर्व दिनक्रम पुढीलप्रमाणे आहे :
मध्यान्हपूर्व पावणेसहा ते सव्वासहा कविता पाठांतर, मध्यान्हपूर्व साडेसहा ते 7 वाजून 40 मिनिटांपर्यंत खेळ आणि मध्यान्हपूर्व 8 वाजून 50 मिनिटे ते मध्यान्हपूर्व 10 ला 5 मिनिटे कमी असेपर्यंत अभ्यास, तर पाठांतर, खेळ आणि अभ्यास यांसाठी तो एकूण किती वेळ खर्च करतो?

11 / 22

एक बस नागपूरहून अमरावतीला 4 तास 20 मिनिटांत पोहोचते. परतीच्या प्रवासाला त्या बसला 10 मिनिटे जास्त वेळ लागतो, तर नागपूर ते अमरावती जाऊन परत येण्यासाठी किती वेळ प्रवास करावा लागेल ?

12 / 22

सकाळी 7.30 ला शाळेत आलेला नीलेश शाळेतून 330 मिनिटांनी घरी जायला निघाला, तर तो किती वाजता घरी जायला निघाला ? (2019)

13 / 22

3 तास 20 मिनिटांमधून । तास 50 मिनिटे वजा केल्यास वजाबाकी किती येईल ?

14 / 22

घड्याळात 1 वाजून 55 मिनिटे झाली असतील, तर तासकाटा व मिनिटकाटा यांच्या अनुक्रमे स्थिती पुढीलपैकी कोणत्या पर्यायांत योग्य तन्हेने दिल्या आहेत ?

15 / 22

2 तास 10 मिनिटे 13 सेकंद म्हणजे किती सेकंद ?

16 / 22

घड्याळात 5 वाजून 55 मिनिटे झाली आहेत. 4 तास 44 मिनिटांनंतर त्या घड्याळात किती वाजले असतील ?

17 / 22

6. सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा.किती मिनिटांनंतर बरोबर पावणेबारा वाजतील ?

download 2

18 / 22

610 मिनिटे =…… तास ……….मिनिटे. या विधानातील रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या

19 / 22

6 तास 52 मिनिटे =………….मिनिटे. (2018)

20 / 22

मध्यान्हपूर्व 7 ते मध्यान्होत्तर 7 हा किती मिनिटांचा कालावधी आहे?

21 / 22

घड्याळात तासकाटा 2 व 3 च्यादरम्यान आहे व मिनिटकाटा 7 वर आहे, तर किती वाजले?

22 / 22

5 तास 35 मिनिटे किती मिनिटे ?

Your score is

The average score is 44%

0%

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *