NAVODAYA ENTRANCE TEST PASSAGE 9
NAVODAYA ENTRANCE TEST PASSAGE 9
रामू एका खेडेगावात राहतो. त्याचे आजोबा शेतकरी आहेत. रामूचे वडीलदेखील शेतकरी आहेत. पावसाळयात रामू शेतावर जातो. तो आंब्याच्या झाडाखाली बसतो. कधी कधी तो एखादा पिकलेला आंबा तोडतो आणि खातो. शेतात जांभळाची झाडेदेखील आहेत. रामू जेव्हा शाळेतून परततो, तेव्हा तो जांभळाच्या झाडाकडे धाव घेतो. तो पिकलेली जांभळे वेचतों. ती तो घरी घेऊन जातो. त्याची आई ती जांभळे धुऊन देते आणि रामू ती खातो.
जेव्हा रामूला शाळा नसते, तेव्हा तो वडिलांबरोबर शेतावर जातो. तो गाईंना कुरणावर चरायला नेतो. त्याचा कुत्रा मोती हादेखील त्याच्याबरोबर जातो. मोती गवतात बागडतो. तो जोराने मुंकतो.
संध्याकाळी ते घरी परततात. तो परिवारासह डाळभात भाजी असे चविष्ट भोजन करतो. रात्रीच्या जेवणानंतर ते आंबे खातात आणि दूध पितात. त्या परिवाराला आपले खेड्यातले जीवन फार आवडते. तो एक सुखी परिवार आहे.
