NET : NAVODAYA ENTANCE TEST PASSAGE 12
NET : NAVODAYA ENTANCE TEST PASSAGE 12

एप्रिलमध्ये, परीक्षेच्या केवळ दोन आठवडे आधी, स्वामीच्या लक्षात आले की वडिलांचा स्वभाव आणखी वाईट होत चाललेला आहे. ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते. जेव्हा स्वामी आपल्या आजीबरोबर गप्पा मारत होता, तेव्हा त्याला सांगितले गेले, “लक्षात ठेव पोरा, परीक्षा आहे. आजी वाट पाहू शकेल. परीक्षा थांबणार नाही.” जर तो आईमागे हिंडताना दिसला, तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येई. तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज कुठेही ऐकू आला, तर त्याच्या वडिलांच्या खोलीतून हुकूम सुटे, “स्वामी, अजून झोपला नाहीस का? सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आहे.” एके दिवशी त्याने वडिलांना विचारले, “माझ्या परीक्षेबाबत तुम्ही इतके धास्तावलेले का आहात?”NET : NAVODAYA ENTANCE TEST PASSAGE 12
1. त्याचे वडील कसे बनले होते ?
(A) प्रसन्न आणि साधे
(B) दुःखी आणि क्रुद्ध
(C) रागीट आणि चिडखोर
(D) चिडखोर आणि कठीण.
2. स्वामी आईमागे हिंडताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाई? –
(A) स्वयंपाकघरात
(B) अभ्यासाच्या टेबलाकडे
(C) वडिलांच्या खोलीत
(D) झोपायच्या खोलीत.
3. उताऱ्यातल्या ‘हुकूम’ शब्दाचा अर्थ आहे :
(A) आदर करणे
(C) पकडणे
(B) शिक्षा करणे
(D) आज्ञा करणे.
4. तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिले की स्वामीला.
(A) अभ्यास करावा लागे
(C) झोपायला जावे लागे
(B) अंथरुणातून उठावे लागे
(D) शाळेत जावे लागे.
5. वडील बदलत चालले आहेत, असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले ?
(A) एप्रिलमध्ये
(C) जूनमध्ये
(B) मेमध्ये
(D) जुलैमध्ये.