दुय्यम सेवापुस्तक ठेवणे , मुळ सेवापुस्तक गहाळ होणे या संदर्भातील सविस्तर महत्वपुर्ण माहिती ! Duplicate Service Book, Original Service Book Important information

दुय्यम सेवापुस्तक ठेवणे , मुळ सेवापुस्तक गहाळ होणे या संदर्भातील सविस्तर महत्वपुर्ण माहिती ! Duplicate Service Book, Original Service Book Important information

दुय्यम सेवापुस्तक ठेवणे , मुळ सेवापुस्तक गहाळ होणे या संदर्भातील सविस्तर महत्वपुर्ण माहिती ! Duplicate Service Book, Original Service Book Important information

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे मुळ सेवापुस्तक अद्यावत ठेवण्याची जबाबदारी ही कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुख / प्रादेशिक कार्यालय प्रमुखांची असते . तर दुय्यम सेवापुस्तक ठेवणे , तसेच जर मुळ सेवापुस्तक गहाळ झाल्यास काय करावेत या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

img 20231230 1739142432664810796108326
Duplicate Service Book, Original Service Book Important information

दुय्यम सेवापुस्तक तयार करुन त्यांमध्ये मुळ सेवापुस्तकांवरुन सर्व नोंदी घेवून कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुख / प्रादेशिक प्रमुखांकडून साक्षांकित करुन घ्यावेत , तर दुय्यम सेवापुस्तक हे कर्मचाऱ्यांच्या सुपुर्त करण्यात येते , त्यांमध्ये सर्व नोंदी तसेच स्वाक्षरी आवश्यक कागतपत्रे चिटकवावेत . दरवर्षी माहे सप्टेंबर अखेरीस वित्तीय वर्षनिहाय मुळ सेवा पुस्तकांमधील नोंदी दुय्यम सेवापुस्तकांमध्ये करण्यात येते .

मुळ सेवापुस्तक गहाळ होणे : मुळ सेवापुस्तक गहाळ झाल्यास , किंवा अन्य काही नैसर्गिक आपत्तीमुळे नाहीशे झाले असता , त्या संदर्भातील अधिकृत अहवाल नियंत्रण अधिकाऱ्यांस सादर केले जाते . त्यानंतर दुय्यम सेवा पुस्तकाच्या आधारे मूळ सेवा पुस्तक नविन तयार करणे बाबत आदेश नियंत्रक अधिकाऱ्यांकडून दिले जाईल अथवा दुय्यम सेवा पुस्तक हेच मुळ सेवापुस्तक म्हणून समजण्याचे आदेश दिले जाईल .

दुय्यम सेवापुस्तक हे मुळ सेवापुस्तक झाल्यास , सदर सेवापुस्तक हे कार्यालयाच्या दप्तरी ठेवले जाईल व परत दुय्यम सेवापुस्तक तयार करुन कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे ठेवावेत .

दुय्यम सेवापुस्तक नसणे / मुळ सेवापुस्तक नष्ट होणे : मुळ सेवापुस्तक नष्ट झाले असतील व दुय्यम सेवा पुस्तक देखिल ठेवले नसतील अशा प्रकरणी मुळ सेवा पुस्तक तयार करण्यासाठी कर्मचारी पुर्वी ज्या ज्या आस्थापनेवर काम केले आहेत , अशा सर्व कार्यालयांमधून वेतनपट , वैयक्तिक नस्ती , कर्मचाऱ्यांच्या सोबत पुर्वी एकत्र काम केलेल्या कर्मचाऱ्यांकडून घोषणापत्र घेणे अथवा आपल्या नियंत्रण अधिकाऱ्यांकडून मुळ सेवापुस्तक तयार करण्याचे आदेश पारित करुन विनाविलंब मुळ सेवापुस्तक तयार केले जाईल .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *