विद्यार्थी पोर्टल Caste Update कशी करावी ? संपूर्ण माहिती….

सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी Student Portal बाबत महत्वाचे…स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत.
सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या माहितीत, ज्या विद्यार्थ्याच्या प्रवर्ग व जात विषयक माहिती मध्ये “not known” नोंदविलेले असेल किंवा माहितीच भरलेली नसेल अशा विद्यार्थ्यांच्या प्रवर्गाची व जात विषयक माहिती पूर्ण करावयाची आहे.
सदरची कार्यवाही संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या स्टुडंट पोर्टलच्या लॉगीन वरून करावयाची आहे .
स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत पुढीलप्रमाणे स्टेप्स पूर्ण करा.
■प्रथमतः या https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login टॅब वर जाऊन आपल्या शाळेचा Username आणि Password टाकून Login करा

यानंतर खालीलप्रमाणे Dashboard दिसेल. येथे Update Student Detailes यावर क्लीक करा.

यानंतर Update Student Details यावर क्लिक करावे .

पुढे इयत्ता म्हणजेच Standard , stream, Division निवडून , go हे बटन दाबा . आपणास सर्व विद्यार्थी यादी दिसेल .

यापुढील माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा