मानसिक क्षमता चाचणी MENTAL ABILITY TEST

MENTAL ABILITY TEST
MENTAL ABILITY TEST

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन



शब्द आणि वाक्ये वाचून व समजून विचार करण्यामध्ये विदयार्थ्यांना भाषेचा अडथळा जाणवू शकतो. त्यामुळे त्यांची विचार करण्याची सुप्त क्षमता प्रकट होऊ शकत नाही. आकृत्या व चित्रे पाहून विचार करण्यामध्ये हा अडथळा येत नाही. यातून सर्वच विदयार्थ्यांची मानसिक क्षमता मोजता येणे शक्य होते. यासाठीच ‘मानसिक क्षमता चाचणी’ या विषयात फक्त आकृत्या व चित्रे या स्वरूपांतील प्रश्न विचारले जातात.



• प्रश्नपत्रिकेतील मानसिक क्षमता चाचणीचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते :

1. या परीक्षेत केवळ आकृतीच्या स्वरूपातील 40 प्रश्न विचारले जातात आणि या विषयासाठी एकूण 50 गुण असतात. प्रत्येक बिनचूक उत्तरासाठी 1.25 गुण दिला जातो.

2. प्रत्येक प्रश्नामध्ये एक प्रश्नआकृती किंवा प्रश्नआकृत्यांचा संच दिलेला असतो आणि चार संभाव्य उत्तरआकृत्यांचा

दुसरा संच दिलेला असतो. त्यांतील अचूक उत्तरआकृती शोधायची असते.

3. संभाव्य उत्तरांच्या चार आकृत्यांखाली (A), (B), (C) आणि (D) असे पर्याय दिलेले असतात. त्यांपैकी अचूक पर्यायाचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ उत्तरपत्रिकेत काळे करायचे असते.

4. ‘ मानसिक क्षमता चाचणी’ या प्रश्नपत्रिकेत पुढील दहा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्नपत्रिकेत या प्रश्नप्रकारांचा क्रम वेगळा असू शकतो.

(1) वेगळे पद शोधा.

(2) जुळणारी आकृती.

(3) आकृती पूर्ण करा.

(4) मालिका पूर्ण करा.

(5) समसंबंध.

(6) भौमितिक रचना पूर्ण करा.

(7) आरशातील प्रतिमा.

(8) घडी घाला व उलगडा.

(9) अवकाश कल्पना (तुकडे जोडा).

(10) लपलेली आकृती शोधा.

मानसिक क्षमता चाचणीच्या सरावासाठी वरील प्रत्येक प्रकारचे भरपूर प्रश्न या पुस्तकात दिले आहेत. विदयार्थ्यांनी ते प्रश्न सोडवून, त्यांची उत्तरे शोधून काढावीत व पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या उत्तरांच्या आधारे आपल्या उत्तरांची पडताळणी करावी.