
भारत सन 1947 ला स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व सहा वेळा काँग्रेसचे अध्यक्ष झालेल्या पंडित जवारलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद या ठिकाणी झाला. केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेऊन नेहरू 1912 मध्ये लॉ ची परीक्षा उत्तीर्ण झाले. भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली न करता स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वतःला वाहून घेतले.
गांधीजींचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. 1912 मध्ये ते काँग्रेसचे सदस्य झाले. 1920 मध्ये प्रतापगड येथे शेतकऱ्यांच्या मोर्चाला संघटित करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात केलेल्या आंदोलनात ते जखमी झाले होते. 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले. त्यांना अटक करून सहा महिने तुरुंगात टाकण्यात आले. 1935 मध्ये झालेल्या अटके वेळी त्यांना अलमोडा येथील तुरूंगात ठेवले. तिथे त्यांनी आत्मचरित्र लिहिल.
1942 च्या आंदोलनात , 9 ऑगस्ट 1942 रोजी त्यांना अटक झाली . नंतर नेहरूंना अहमदनगर येथील तुरुंगात ठेवण्यात आले . तेथून 15 जून 1945 रोजी त्यांची मुक्तता करण्यात आली . त्यांनी नऊ वेळा तुरुंगवास भोगला .
स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या हंगामी सरकारमध्ये आणि स्वातंत्र्यानंतरही ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले 27 मे 1964 रोजी त्यांचे निधन झाले नेहरूंच्या कार्यकाळात लोकशाही मजबूत करणे देश व घटनेतील धर्मनिरपेक्षता कायम करणे आणि विविध योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास करणे आदी कामे करण्यावर भर देण्यात आला.त्यांनी जगातील अनेक देशांमध्ये प्रवास केला स्वातंत्र्यानंतर आंतरराष्ट्रीय नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली नेहरूनी जगासमोर पंचशील तत्वे मांडली. 1954 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले