PM POSHAN SHAKTI SCHEME 2024  PRIZES |IMP INSTRUCTIONS |

PM POSHAN SHAKTI SCHEME 2024  PRIZES |IMP INSTRUCTIONS |

PM POSHAN SHAKTI SCHEME 2024

विषय :- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्मितीकरीता पूर्वतयारी करणे व सर्व शाळांना निर्देश देणे बाबत.

संदर्भ :

– १. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि. १५ ऑक्टोंबर, २०१९.

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ- २०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३, दि.११ जुलै, २०२३

केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करुन विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होवून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत.

प्रस्तुत योजनेंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने उत्कृष्ठ परसबाग स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा परिणाम म्हणून राज्यामधील सुमारे २५००० शाळांमध्ये परसबाग निर्माण झालेल्या आहेत.

सन २०२४-२५ या वर्षामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांतील १०० टक्के शाळांमधून परसबाग निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित करण्यात आले आहे.

१. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या अनुषंगाने परसबाग निर्माण करण्याकरीता शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समिती, पालक, गावातील प्रगतीशील शेतकरी या सर्वांच्या सहकार्याने परसबाग निर्मितीकरीता आवश्यक ती पूर्वतयारी करणेकरीता खालील प्रमाणे सर्व जिल्ह्यांना तसेच शाळांना निर्देश देण्यात येत आहेत.

PM POSHAN SHAKTI SCHEME 2024

wp image468323036589272275

i. प्रस्तुत उपक्रमांतर्गत परसबाग निर्मितीकरीता शाळांनी नजिकचे कृषि विज्ञान केंद्र, कृषि शाळा, कृषि विभागातील कृषि सहायक / पर्यवेक्षक, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था (NGO), सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषि तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे.

ii. परसबाग निर्मितीकरीता आवश्यक जमीनीची मशागत, नागरणी इत्यादी कामे पूर्वतयारीच्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समिती, पालक, गावातील प्रगतीशील शेतकरी या सर्वांच्या सहकार्याने करावीत.

iii. परसबागेमध्ये पुढील वर्षामध्ये कोणकोणत्या भाजीपाल्याची लागवड करावयाची याची पूर्वनिश्चिती करुन घेण्यात यावी तसेच याकरीता स्थानिक पातळीवर बियाण्यांची उपलब्धता करुन ठेवण्यात यावी.

iv. परसबागेस वर्षभर पुरेल याकरीता पाण्याचे आवश्यक नियोजन करण्यात यावे. पाण्याची उपलब्धतेच्या अनुषंगाने पाणी बचतीकरीता ठिबक सिंचन, तुषार सिंचनाची व्यवस्था करण्यात यावी, याकरीता लोकसहभाग मिळविणेचा प्रयत्न करणे.

V. परसबाग ही पूर्णपणे सेंद्रिय असेल याकडे विशेष लक्ष द्यावे, कोणत्याही परिस्थितीमध्ये परसबागेकरीता रसायनांचा वापर करु नये. विशेषतः कमी जागेमध्ये मायक्रोग्रीन पध्दतीने पोषक पालेभाज्यांची लागवड करता येते.


vi. नागरी भागातील शाळांमध्ये विशेषः ज्या ठिकाणी जागेच्या उपलब्धतेबाबत अडचणी आहेत, अशा शाळांमध्ये व्हर्टिकल गार्डनची उभारणी करण्यात यावी. शासनाने याकरीता दि. ११ जुलै, २०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये विस्तृत सूचना दिलेल्या आहेत.

vii. नागरी भागामध्ये विशेषतः बृहन्मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर या भागातील शाळांमधून परसबागांची उभारणी करण्याकरीता विशेष तज्ञ लोकांचे मार्गदर्शन उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने शासनाने दि. २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी तज्ञांची समिती स्थापन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकारी, महानगरपालिका यांनी याबाबत शासन निर्देशानुसार कार्यवाही करुन आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाधिक शाळांमधून परसबागांची उभारणी करणेकरीता विशेष प्रयत्न करावेत.


२. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा.

३. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पसरबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता परसबाग स्पर्धांचे आयोजन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

४. राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्याच्या दृष्टीने सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. याकरीता उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे तालुका, जिल्हापातळीवर

wp image8239535309224080554

माहे ऑगस्ट, २०२४ ते ऑक्टोबर, २०२४ या कालावधीमध्ये आयोजन करण्यात येणार आहे ज्यामुळे परसबाग निर्मितीस प्रोत्साहन मिळेल.

५. सन २०२४-२५ या वर्षामध्ये शासनाने गतवर्षीच्या पेक्षा अधिक संखेने शाळांना उपक्रमामध्ये सहभागी होता यावे या अनुषंगाने बक्षीसांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे.


६. प्रस्तुत उपक्रमाची अंमलबजावणी व आवश्यक पूर्वतयारी शिक्षणाधिकारी (प्राथ.), सर्व जिल्हे यांनी या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करुन घ्यावयाची आहे, तथापि तालुकानिहाय क्षेत्रीय अधिकाऱ्यांना १०० टक्के शाळांमधून परसबाग उभारणीचे उद्दिष्ट निर्धारित करुन द्यावे.

७. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी याबाबत नियोजन करुन जिल्हातील सर्व शाळांमधून परसबागांची उभारणी होईल याकरीता विशेष लक्ष द्यावयाचे आहे. तसेच याअंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास दि. ३० मे, २०२४ सादर करावा.

wp image5313004606412271930

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *