Summative Test 1 / Year 2023 Time Table | Important Instructions| chatbot

२. विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिका, शाळेस एक याप्रमाणे शिक्षक सूचनापत्र व विषयनिहाय उत्तरसूची याप्रमाणे तालुका स्तरापर्यंत पुरवठा करण्यात येईल. ३. तालुकास्तरावर परीक्षा साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित व स्वतंत्र खोली गट शिक्षणाधिकारी

यांनी ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त प्रश्नपत्रिका ठेवाव्यात प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत किंवा भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी. ४. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी केंद्र

स्तर व शाळास्तरावर वेळेत पोचतील याची व्यवस्था करावी. ५. इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा झाला असल्याची खातरजमा तालुका

समन्वयकांनी करून घ्यावी.

६. केंद्रस्तरावर शाळांच्या पटसंख्याप्रमाणे प्रश्नपत्रिका, शिक्षक सूचनापत्र व उत्तरसूचीचे वितरण करावे. त्यासाठी तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. त्यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. ७. कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्याचे झेरॉक्स काढण्यात येऊ नये. अथवा

झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तथापि, ८. तालुका अंतर्गत कमी जादा संख्या तपासून शाळानिहाय परीक्षा साहित्याचे समायोजन करता

येईल.

२. जिल्हांतर्गत कमी जादा समायोजनासाठी जिल्हास्तरावर ०५ टक्के अतिरिक्त परीक्षा साहित्याचा

पुरवठा करण्यात येणार आहे. सदर साहित्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक) याचे ताब्यात असेल व

जिल्ह्यातील सर्व शाळांना पुरसे परीक्षा साहित्य पोच झाले असलेची खात्री चाचणी पूर्वी करणे आवश्यक

असेल. १०. प्रश्नपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे प्रकार होणार

नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. ११. तालुका स्तरावर प्रश्नपत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप

करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वय / गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.

शिक्षक व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये. विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका देण्यात याव्यात.

  • चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत:-

तालुक्यातील तील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन गटशिक्षणाधिकारी यांनी करावे . यात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, IED विशेष तज्ञ व विशेष शिक्षक यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शाळा भेटी होतील याचा प्रयत्न

३. चाचणीचा अभ्यासक्रम :- प्रथम सत्रातील अध्ययन निष्पत्तींवर आधारित असेल.

४. चाचणीचे स्वरुप:- सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीमधील तरतूदीनुसार सदर चाचण्यांची इयत्तानिहाय गुणविभागणी असेल. त्यामध्ये लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असेल. ५. चाचणी निर्मिती सदर चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्यांची निर्मिती राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे

मार्फत करण्यात येईल. ६. चाचणी कोणासाठी- संकलित मूल्यमापन चाचणी १ साठी छापील परीक्षा साहित्याचा पुरवठा (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांनाही करण्यात येईल

७. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात यावी. ८. शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या-त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.

९. शिक्षकांनी चाचणीचे धर्तीवर नमुना प्रश्न निर्मिती करुन विद्यार्थ्याचा सराव घ्यावा व मार्गदर्शन करावे १०. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारानुसार शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ / विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

११. प्रस्तुत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना सर्वसाधारण सूचना, इयत्तानिहाय व विषयनिहाय

शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून

कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचनासोबत उत्तरसूची आहे. त्यानुसार चाचणी तपासून गुणनोंद

करावी.

१२. चाचणीचे गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात करावी. १३. मूल्यमापन / चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.

१३. मूल्यमापन / चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी. जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.

१४. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी साहित्य शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना छापील स्वरुपात पुरवठा करण्यात येणार असलेमुळे सदर विषयांसाठी वेगळ्याचाचणीचे आयोजन शाळांनी करु नये.

  • प्रश्नपत्रिका व परीक्षा साहित्य वाहतूक व वितरणाबाबत सूचना :- १. तालुकास्तरावर चाचणी आयोजनाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची सर्वस्वी जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांची असेल.

Page 3

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *