शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर गैरहजेरी , रजेवरून परत येणे बाबत सविस्तर रजा नियमावली !
रजा नियम 34 नुसार , रजा मंजूर करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांनी रजा वाढवून दिली नसेल तर , मंजूर रजा कालावधी संपल्यानंतर शासकीय कर्मचारी गैरहजर राहिल्यास , गैरहजरीच्या कालावधीसाठी रजावेतन मिळण्यास सदरचा कर्मचारी अपात्र असेल .
त्याचबरोबर असा कालावधी देय अर्धवेतनी रजेच्या खाती खर्ची घातला जाईल व उर्वरित कालावधी असाधारण रजा म्हणून गणली जाईल , त्याचबरोबर मंजूर रजा कालावधी संपल्याच्या नंतर स्वतःच्या इच्छेने हेतू परस्पर अनुपस्थित राहिल्यास कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी तरतुर महाराष्ट्र नागरी रजा नियम 34 नुसार करण्यात अलेली आहे .
रजेवरुन परत बोलावणे : महाराष्ट्र नागरी रजा नियम 33 नुसार रजेवर असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यास त्याला मंजूर करण्यात आलेल्या रजेच्या कालावधी समाप्त होण्यापूर्वीच रजा मंजूर करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याच्या मान्यते शिवाय कामावर परस्पर रुजू होता येत नाही . तर सेवानिवृत्तीपूर्वी रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास तो पदावरून सेवानिवृत्तीपूर्वी रजेवर गेला असल्यास त्यावर त्याची नियुक्ती करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याच्या मंजुरी शिवाय हजर होता येणार नाही .
त्याचबरोबर वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूर करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय , कामावर रुजू करून घेता येत नाही , असे नियम महाराष्ट्र नागरी रजा नियम 33 नुसार नमूद करण्यात आले आहेत .
http://Marathi Reading: https://www.youtube.com/playlist?list=PLvE2_y3YdicnpeIvLha_cheZkJtsy6Shn