DIRECT RECRUITMENT 2023
आदिवासी_विकास_विभाग_सरळसेवा_भरती_2023
DIRECT RECRUITMENT 2023 IN ADIVASI VIBHAG

आदिवासी विकास विभाग
महाराष्ट्र शासन
आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक
आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गडकरी चौक, जुना आग्रारोड,
नाशिक-422002 email- admnctd.nsk-mh@gov.in
जाहिरात क्रमांकः आस्था- पद भरती-२०२२/प्र.क्र. १४२/का. २(१)/ नाशिक
महाराष्ट्र शासन
दिनांक: २३/११/२०२३
DIRECT RECRUITMENT 2023 IN ADIVASI VIBHAG
आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक पदआ-३८१७/प्रक्र.१३९/का.१५ दिनांक १६ नोव्हेंबर, २०२२ अन्वये सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला असून शासन निर्णय वित्त विभाग, क्र. पदनि-२०२२/प्रक्र.२/२०२२/ आ.पु.क. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ अन्वये ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे
त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक/ ठाणे/ अमरावती / नागपुर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक/ उपलेखापाल-मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) / आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक / लघुटंकलेखक/ गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष/ ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / प्राथमिक शिक्षण सेवक (नॉनपेसा) / माध्यमिक शिक्षण सेवक (नॉनपेसा) / उच्च माध्यमिक शिक्षण सेवक (नॉनपेसा) तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/ या लिंक वर उपलब्ध करुन संकेतस्थळावर दिलेली आहे.
परिक्षेचे वेळापत्रक
अ. क्र. ऑनलाईन पध्दतीने अर्ज व परिक्षा शुल्क भरण्याचा दिनांक व वेळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक
दिनांक २३.११.२०२३ दुपारी १५.०० वाजता पासुन ऑनलाईन परिक्षेचा दिनांक १३.१२.२०२३ रात्री २३.५५ वाजे पर्यंत.
https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
भरती प्रकिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सुचना वगैरे https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसुन या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.
DIRECT RECRUITMENT 2023 IN ADIVASI VIBHAG
१. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी, अटी व शर्ती :-
१. जाहिरातीत नमूद केलेल्या पद संख्येत व प्रवर्गनिहाय आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
२. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तुत स्पर्धा परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
३. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. तथापि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जाहिरातीत नमूद नसलेल्या समांतर आरक्षणाकरीता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पद संख्येमध्ये बदल/वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता एखाद्या समांतर आरक्षणासाठी पद उपलब्ध नसले तरीही उमेदवारांनी सदर जाहिरातीस अनुसरून अर्ज करावेत.
४. परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व प्रवर्गनिहाय पद संख्येमध्ये बदल करण्याचे तसेच
भविष्यात शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल झाल्यास त्याबाबत संकेतस्थळावर प्रसिध्दीच्या अधिन राहून अटी-शर्तीमध्ये बदल
करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी व त्यांचे नियंत्रण अधिकारी यांचेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
५. महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन, दिव्यांग तसेच अनाथांसाठीचे समांतर आरक्षण शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.
६. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे. तसेच महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क्र-महिआ-२०२३/कार्या-२ दिनांक ०४ मे २०२३ अन्वये खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांसाठी निवडीकरिता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट रदद करण्यात आलेली आहे.
DIRECT RECRUITMENT 2023 IN ADIVASI VIBHAG
DIRECT RECRUITMENT 2023 IN ADIVASI VIBHAG
७. एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने
प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असेल तर संबंधित जात/जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.
८. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब) गटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे
आंतरपरिवर्तनीय असुन आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्यावत शासन
धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवतेच्या आधारावर करण्यात येईल.
९. समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०१२/प्र.क्र.१६/१२/१६- अ, दिनांक १३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण- १११८/प्र.क्र.३९/१६-अ, दिनांक १९ डिसेंबर, २०१८ आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
१०. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील (ईडब्लूएस) उमेदवारांकरिता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: सघाओ- ४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दिनांक १२ फेब्रुवारी, २०१९ व दिनांक ३१ मे, २०२१ अन्वये विहीत करण्यात आलेले प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
DIRECT RECRUITMENT 2023 IN ADIVASI VIBHAG
११. अद्यावत नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र / आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिका-याने
वितरीत केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
१२. सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल.
१३. अराखीव (खुला) उमेदवाराकरीता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषसंदर्भातील अटीची पुर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारासह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरिता विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित / उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गा संदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
१४. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.
सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ
असेल.
१५. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र.मकसी-१००७/ प्र.क्र.३६/ का.३६. दि. १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवार संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमातील सर्व अटींची पूर्तता करीत असल्यास ते उमेदवार त्या संबंधित पदांसाठी अर्ज करू शकतील. त्यासाठी संबंधित मराठी भाषिक उमेदवारांनी ते महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या ८६५ गावातीलच रहिवासी असल्याबाबतचा त्यांचा वास्तव्याचा सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला सादर करणे अनिवार्य राहील.
१६. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता (सामाजिक अथवा समांतर अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा/नियम/आदेशानुसार) विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्विकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापूर्वीचे वैध असणारे प्रमाणपत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे. १७. सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधिन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.
१.१८ खेळाडु आरक्षण
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण-: १७१४/प्र.क्र.३२५/क्रीयुसे-२, दिनांक २२ एप्रिल २०१५ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः राक्रीचो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे- २, दिनांक १ जुलै, २०१६, तसेच शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीपो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १८ ऑगस्ट, २०१६, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण- १७१६/प्र.क्र. १८/क्रीयुसे-२, दिनांक ३० जून २०२२, आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
२) प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकान्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे. ३) खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील
निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीच्या पडताळणीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक
कार्यालयाकडे परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे, अन्यथा प्राविण्य
प्राप्त खेळाडूसाठी आरक्षणाकरीता पात्र समजण्यात येणार नाही.
४) एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडु उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांचे प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
५) कागदपत्रे पडताळणीवेळी खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्राविण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो. याविषयीचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणी बाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवाराचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारस / नियुक्तीकरीता विचार करण्यात येईल.
१.१९ दिव्यांग आरक्षण:-
१. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक दिव्यांग २०१८/प्र.क्र. ११४/१६ अ. दिनांक २९ मे, २०१९ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
२. प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या संवर्ग/पदांच्या बाबतीत शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्रमांक अपंग-
२५१९/प्रक्र.०३/का-१५ दिनांक १६.०२.२०२१ अन्वये दिव्यांगासाठीची पदे सुनिश्चित करण्यात आली आहेत. ३. दिव्यांग व्यक्तीसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण मंजुर पद संख्येपैकी असतील.
४. दिव्यांग व्यक्तीची सबंधित संवर्ग पदांकरीता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहिल.
५. दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे, याचा विचार न
करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल.
६. संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकारचे किमान ४०% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार / व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी / सवलतीसाठी पात्र असतील.

































