1) एखाद्या शाळेने त्यांच्या शाळेत नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची त्याच्या जुन्या शाळेस online Request पाठविल्यानंतर सदर Request जुन्या शाळेने 7 दिवसात Approve / Reject करणे आवश्यक आहे. विहीत मुदतीत जुन्या शाळेने तसे न केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्र प्रमुख यांचेकडे जाईल व केंद्र प्रमुख सदर विद्यार्थीबाबत खात्री करून प्राप्त Request Approve/Reject करतील.
2) जर जुन्या शाळेने सदर online Request प्राप्त झाल्यानंतर जर 7 दिवसात Reject केली तर नवीन शाळा विद्यार्थी त्यांचेकडे शिकत असल्यास पुन्हा त्याच जुन्या शाळेस online Request पाठवतील व सदर शाळेने 3 दिवसाच्या मुदतीत Approve / Reject करणे आवश्यक आहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने तसे न केल्यास अथवा Reject केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्र प्रमुख यांचेकडे जाईल व केंद्र प्रमुख सदर विद्यार्थीबाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve / Reject करतील. (Student portal वर केंद्रप्रमुखांचे लॉगिन करून Pending request या tab मध्ये केंद्रातील सर्व शाळांच्या प्रलंबित Request दिसतात व तिथून त्या आपण Aprove / Reject करु शकतो.)
