नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचा-यांना एकस्तर वेतनश्रेणी सुरु राहणार

नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचा-यांना एकस्तर वेतनश्रेणी सुरु राहणार

कार्यालय

अपर आयुक्त आदिवासी विकास

आदिवासी विकास भवन, गिरीपेठ, अमरावती रोड, नागपूर ४४००१० ई-मेल : atenagpur@yahoo.co.in

दूरध्वनी क्र. ०७१२-२५६०१२७, २५६०३१४

क्र.आस्था-2022/प्र.क्र./का.4(1) ४६८ १

दिनांक :- काटा महू

प्रति,

प्रकल्प अधिकारी,

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

विषय :- नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचा-यांना एकस्तर वेतनश्रेणी सुरु ठेवणेबाबत.

संदर्भ : सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमाक टिआरएफ 2000/प्र.क्र.3/बारा दिनांक 6.08.2002

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, राज्यातील आदिवासी/ नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत

असलेल्या सर्व पदाकरीता एकस्तर पदोन्नतीबाबत संदर्भिय शासन निर्णयामध्ये खालील प्रमाणे तरतूद आहे.

‘आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून अ ते ड मधील सर्व पदधारकांना संबंधित कर्मचारी / अधिकारी त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच्या काळात त्यांनी धारण केलेल्या मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ / पदोन्नतीची वेतनश्रेणी व त्याअनुषंगाने वेतननिश्चितीचा लाभ देण्यात यावा. ज्या कर्मचारी / अधिका-यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा देण्यात आलेला आहे त्यांना आणखी वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय नसेल. ही एकस्तर पदोन्नतीची योजना दि. 1 जुलै, 2002 पासून अमलात येईल आणि तो संबंधित कर्मचारी / अधिकारी आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यन्तच अनुज्ञेय राहील. स्था क्षेत्रातून कर्मचारी / अधिकारी बिगर आदिवासी क्षेत्रात परत आल्यावर तो त्यांच्या मुळच्या संवर्गातील वेतनश्रेणीत पूर्वीच्या वेतनाच्या अनुषंगाने वेतन घेईल. “

उक्त तरतूदीनुसार एकस्तर पदोन्नतीचा लाभ संबधीत कर्मचारी / अधिकारी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत अनुज्ञेय आहे. त्यामुळे जरी या कार्यालयाचे स्तरावरून नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचा-यांना वरिष्ठ श्रेणीचा आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात आलेला असला तरी अश्या शिक्षकांना / / शिक्षकेत्तर कर्मचा-यांना ते नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत त्यांना एकस्तर वेतनश्रेणीनुसार वेतन सुरु ठेवण्यात यावे.

share pdf exportpage1
Ekstar

तसेच जे शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी नक्षलग्रस्त क्षेत्रातून बदलीने / पदोन्नती / सेवानिवृत्तीने / अन्यथा अन्य कारणाने बिगर आदिवासी क्षेत्रात परत आल्यावर त्यांना त्यांच्या मुळ संवर्गातील पदावरील अनुज्ञेय वरिष्ठ / निवड श्रेणीच्या / आश्वासित प्रगती योजनेच्या वेतनश्रेणीत वेतननिश्चिती करावी.

2579/23 (रविंद्र ठाकरे, भा.प्र.से.)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर

प्रतिलीपी :- 1) मा. आयुक्त, आदिवासी विकास, म.रा.नाशिक, यांना माहितीस सविनय सादर 2) मा. मुख्य सादरकर्ता अधिकारी, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ, नागपूर

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर

क्र. ०७१२-२५६५००८

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *