नमुना उतारा
क्षमा करणे चांगले, परंतु केलेली क्षमा विसरून जाणे, हे त्यापेक्षाही चांगले आहे. दुसऱ्याला केलेली क्षमा आपण लक्षात ठेवली की, अहंकार वाढतो. क्षमा करावी व विसरून जावे. क्षमा हे वीरांचे भूषण आहे. पापाचे पुण्यामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती क्षमेमध्ये आहे. जो माणूस क्षमाशील आहे. त्याला संरक्षणासाठी बाह्य कवचाची आवश्यकता लागत नाही. सुडाचा आनंद हा एक दिवस टिकतो, परंतु क्षमेचा आनंद हा सदैव टिकतो. जीवनातील सारे दुःख पचवण्याचे सामर्थ्य वाढणे म्हणजे क्षमावृत्ती वाढणे होय. आपण जगाला क्षमा करीत राहिलो की, तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो व अखंड आनंद प्राप्त होतो.

(1) उताऱ्यात आलेल्या वर्णनावरून पुढीलपैकी योग्य विधान कोणते ?
(1) दुसऱ्याला केलेली क्षमा लक्षात ठेवावी.
(2) सुडाचा आनंद अमर्याद टिकतो.
(3) केलेली क्षमा विसरून जावे
(4) क्षमा करण्याने अहंकार वाढतो
(2) शूर वीरांचा खरा अलंकार कोणता ?
(1) पुण्य
(2) क्षमा
(3) अहकार
(4) सामर्थ्य,
(3) माणसाचा गर्व केव्हा वाढतो ?
(1) पुण्य मिळवल्यावर
(2) आनंद मिळाल्यावर
(3) क्षमा केल्यावर
(4) केलेली क्षमा लक्षात ठेवल्यावर.