या कर्मचाऱ्यांना मिळणार 10 मे रोजी फुल पगारी रजा

आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणूकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे.ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा,१९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते.

Leave for state employees
भारत निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२३ चा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. सदर निवडणुकीचे मतदान बुधवार दिनांक १० मे २०२३ रोजी होणार आहे. कर्नाटक राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या (सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत.

कर्नाटक राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा यासाठी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.

Employees Leave for voting


निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी / कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, इत्यादींना लागू राहील.

State employees leave news
अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी,कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कर तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.

कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोनता सांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.

पगार सुट्टी शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *