मध्ये प्रार्थामक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केला आहे. त्यानुसार सहा ते चौदा वषे
वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अर्धिनियम, [२1 of Children
to Free and Compulsory Education. ACT 2009 (No. 35. 2009)] केंद्र शासनाने
पारित करुन तो भारत सरकारच्या २७/०८/२००९ च्या राजपत्रात प्रसिध्द केला आहे. तसेच भारत
सरकारच्या दिनांक १६/०२/२०१० च्या राजपत्रात सदर अर्धिनियम दिनांक ०१/०४/२०१० पासून संपूर्ण
भारतात (जम्मू व काश्मीर वगळता) लागू केला असल्याचे नमूद केले आहे.
२. समता, सामाजिक न्याय, लोकशाही आणि मानवी समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना ही मूल्ये,
सर्व मुलांच्या प्रार्थामक शिक्षणाच्या माध्यमातून साधली जाऊ शकतात. यादृष्टीने हा अर्धिनियम
M.Gr, A.doc शू
तयाला छा
अंमलात आणला आहे. त्यामुळे सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व बालंकाना मोफत व सक्तीचे
प्रार्थामक शिक्षण पुरविण्याची. त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची, उपस्थितीची आणि प्रार्थामक शिक्षण
पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे.
3.
संदर्भाधीन दिनांक १६ जून, २०१० च्या शासन निर्णयान्वये इयत्ता पाहली ते आठवीच्या
अंमलात आणला आहे. त्यामुळे सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व बालंकाना मोफत व सक्तीचे
प्रार्थामक शिक्षण पुरविण्याची. त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची, उपस्थितीची आणि प्रार्थामक शिक्षण
पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे.
३. संदर्भाधीन दिनांक १६ जून, २०१० च्या शासन निर्णयान्वये इयत्ता पाहली ते आठवीच्या
वर्गातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे व त्यांची संपादणूक पातळी वाढविण्याबाबत
आदेश निर्गमत करण्यात आले आहेत. सदर अधिनियमातील कलम २९ (१) व (२) नुसार इयत्ता
पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्याची बाब शासनाच्या
विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे.
शासन निर्णय
शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. विकाक-२००९/प्र.क्र.२९२/प्राशि-१,
दि. १० मे. २०१० अन्वये बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९,
दिनांक ९ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार इयत्ता आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना
कोणत्याही बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार नाही. सदर अधिनियमामधील कलम २९ (१) व (२) नुसार
सन २०९०-२०११ या शेक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीसाठी पुढीलप्रमाणे सातत्यपूर्ण
सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे.
साततत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचा हेतू
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगाने मूल्यमापन
करण्यासाठी वापरावयाची शाळास्तरावरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय.
त्यामध्ये दोन प्रकारच्या उद्दिष्टांवर॑ भर देणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिले उद्दिष्ट
विद्यार्थ्याच्या व्यापक अध्ययन प्रक्रियेचे सातत्यपूर्ण मूल्यमापन ((-01(1119′ 1 ५गपक्षांठा
and Assessment of Broad based Learning) anf Tat उदिष्ट वर्तनातील दूश्यरुप
feat ada frei (Behavioural Outcomes).
सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन
पदूधतींचा समावेश राहील.
कार्यपध्दती –
(अ) आकारिक मूल्यमापन (7०1190९ ए१पळया)
(विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन)
सर्व शिक्षकांनी खालील साधने-तंत्रे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारिक
मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्याथ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवाव्यात.
१) दैनोदन निरीक्षण.
२) तोंडी काम (प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन. भाषण-संभाषण, भूमिकाभिनय. मुलाखत, गटचर्चा
इत्यादी )
३) प्रार्त्याक्षके / प्रयोग.
४) उपक्रम / कृती (वैयक्तिक, गटात, स्वयं-अध्ययनाद्वारे)
५) प्रकल्प
६) चाचणी (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारीक स्वरुपात घ्यावयाची छोट्या
कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह चाचणी (00९1 000 (25)
७) स्वाध्याय / वर्गकार्य (माहिती लेखन. वर्णन लेखन, निबंध लेखन, अहवाल लेखन, कथा
५) प्रकल्प
६) चाचणी (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारीक स्वरुपात घ्यावयाची छोट्या
कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह चाचणी (00९1 000 test)
७) स्वाध्याय / वर्गकार्य (माहिती लेखन, वर्णन लेखन, निबंध लेखन, अहवाल लेखन, कथा
लेखन, पत्र लेखन, संवाद लेखन व कल्पना विस्तार इत्यादी)
८) इतर : प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य
साधने
आकारिक मूल्यमापनात वरील मूल्यमापनाची साधने-तंत्रे यापैकी इयत्ता, विषय आणि
उद्दिष्टे विचारांत घेऊन अधिकाधिक साधन-तंत्रांचा वापर करावा. यात किमान पाच साधने-
तंत्रे यांचा वापर करावा. कला, कार्यानुभव, शारिरीक शिक्षण व आरोग्य या विषयांसाठी
किमान तीन साधने-तंत्रे यांचा वापर करावा. प्रत्येक साधन-तंत्रास योग्य भारांश द्यावा.
तसेच विद्यार्थी वषभरात किमान एक प्रकल्प करतील असे पहावे. प्रत्येक सत्रात किमान एक
छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह लेखी ज्वाचणी (0101 book test)
घ्यावी. विद्यार्थी, विषय आणि उद्दिष्टे. इत्यादीनुसार उपरोक्त साधन-तंत्राच्या उपयोगाबाबत
आकारिक मूल्यमापनात लवचिकता राहील.
Faevaluation gr\Final M.Gr, A.doc
(ब) संकलित मूल्यमापन (Summative Evaluation)
(ठराविक काळानंतर एकत्रित स्वरुपात करावयाचे मूल्यमापन)
प्रथम सत्राच्या अखेरीस पहिले संर्कालत मूल्यमापन करावे. द्वितीय सत्राच्या अखेरीस दुसरे
सं्कालत मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मूल्यमापनात विषयांच्या उद्दष्टानुसार लेखी, तोंडी,
प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश करावा.
आकारिक आणि संकलित मूल्यमापनाचा भारांश पुढीलप्रमाणे राहील.
आकारिक व संकलित मूल्यमापन भारांश : प्रत्येक सत्रासाठी व प्रत्येक विषयासाठी
(कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण व आरोग्य हे विषय वगळून)
झ्यत्ता = zs ;
z लेखी
/प्रात्यक्षिक
पहिली व दुसरी ७०% | १०% | २०% । १००%
| तिसरी व चोथी ६७% 20% | ३०% | १००%
पाचवी व सहावी 40% 20% yo% | १००%
सातवी व आठवी | ४०% | १०% । ५०% | Ro0%
iL jo
प्रपत्र-अ मध्ये वरील भारांशानुसार तक्ता दिला आहे.
सर्वसाधारण सूचना
मूल्यमापन हे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे एक अविभाज्य अंग असल्याने आनंददायी
अध्ययनाबरोबर मूल्यमापनदेखील आनंददायी असावे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन पूर्णपणे वर्ग /
शाळापातळीवरच गांभीर्याने करण्यात यावे. मूल्यमापन हे उद्दिष्टानुवती असावे आणि ते वर्षभर
सातत्याने करावे.
आकारिक मूल्यमापनासाठी सूचना .
१. आकारिक मूल्यमापन :- .
विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौध्दिक, भावनिक असा सर्वांगीण विकास होऊन त्यांचे
व्यक्तिमत्त्व कसे आकाराला येत आहे हे निर्यामतपणे पडताळून पाहाणे म्हणजेच आकारिक
मूल्यमापन शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आकारिक मूल्यमापनाला
अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन गांभीर्याने करणे
आवश्यक आहे.
१९.९ आकारिक मूल्यमापन करण्यासाठी आठ साधने-तंत्रे वापरून केलेल्या मृल्यमापनामधील
विद्यार्थ्यांचा प्रतसाद / सहभाग विचारात घ्यावा. मूल्यमापनाचा विचार जीवन
कोौशल्यांच्या अंगाने करावा. विद्याथ्यांची जिज्ञासा, शोधक वृत्ती, चिकित्सक वृत्ती,
सर्जनशील विचार करण्याची क्षमता, संवेदनशीलता, विद्याथ्यांचे परस्परांशी असलेले
संबंध, सहज संवाद साधण्याची क्षमता, ताणतणावांना तोंड देण्याची भावनिक
ताकद या सर्व गोष्टींची दखल घ्यावी. ही सर्व कोशल्ये विद्याथ्यांच्या वर्तनात दृश्य
स्वरुपात येण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांशी वेळोवेळी सुसंवाद साधावा. त्यामुळे शिक्षण
प्रक्रिया उद्दिष्टानुरुप व जीवनाभिमुख होण्यास मदत होईल.
१.२ आकारिक मूल्यमापनामधून सोवधानातील मूल्ये, गाभाघटक व जीवन कोशल्ये यांचे
मूल्यमापन व्हावे.
१.३ प्रत्येक सत्रातील आकारिक मूल्यमापनामध्ये सातत्य राहावे. वरील आकारिक
मूल्यमापनाच्या आठ साधन-तंत्रांपकी विषय व उद्दिष्टानुसार उपयुक्त मूल्यमापन
साधनाद्वारे विद्याथ्यांचे मूल्यमापन करण्यात यावे.
१.४ कला, कार्यानुभब आणि शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांमुळे विद्यार्थ्यांचा सवांगीण
बिकास होण्यास मदत होते. शिक्षणर्प्नाक्रया जीवनाशी जोडली जाते व मूल्यांचा परिपोष
होतो. त्यामुळे या विषयांचे मूल्यमापन योग्यप्रकारे करुन विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन
द्यावे.
१.५ आकारिक मूल्यमापन करताना शिक्षकांच्या मार्गदर्शनातील उणीवा आणि विदयार्थ्यांच्या
अध्ययनातील अडचणी दूर होऊन विद्याथ्यांचे मूलभूत संबोध (0010005) व
कौशल्ये दृढ होण्यासाठी योग्य ते नियोजन करुन कृती करावी.
१.६ प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध स्वरुपाच्या सुप्त क्षमता असतात. त्या सुप्त क्षमतांचा शोध
घेण्यासाठी व त्यांचा बिकास साधण्यासाठी विविध अध्ययन अनुभव व उपक्रम
योजावेत. त्यांतून साधल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्व विकासाचे वेळोवेळी मूल्यमापन
करावे. .
१९.७ अतिरिक्त पूरक मार्गदर्शन - आकारिक मूल्यमापन करताना जे ववद्याथी
संपादणुकीमध्ये मागे असल्याचे आढळून येईल अशा विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील
अडचणी / त्रुटींचा शोध घ्यावा व त्यानुसार वेळच्यावेळी विद्यार्थ्यांना वेयक्तिक अथवा
गटात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करुन त्यांना अर्पोक्षत संपादणूक पातळीपर्यंत
आणावे.
२. संकलित मूल्यमापन
संकलित मूल्यमापन प्रथम व द्वितीय सत्राच्या अखेरीस लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक
स्वरुपात करण्यात यावे. लेखी स्वरुपातील साधनांमध्ये मुक्तोत्तरी प्रश्नांचा (001
ended questions) stfean ame aera यावा. संविधानातील मूल्ये, गाभाघटक,
जीवन कौशल्ये व दूरगामी उद्दिष्टे या संदर्भातील मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने विचार
करण्यात यावा.
२.९ पहिले संकलित मूल्यमापन प्रथम सत्राच्या अखेरीस व दुसरे संकलित मूल्यमापन
द्वितीय सत्राच्या अखेरीस तोंडी प्रात्यक्षिक वर्ग स्तरावर/शाळा स्तरावर शिक्षक व
मुख्याध्यापक यांनी ठरवून करावे.
२.२ संपूर्ण शिक्षण प्रक्रियाच आनंददायी असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांला आपली मते मुक्तपणे व सहजतेने देता येतील/व्यक््त करता येतील अशा रीतीने मूल्यमापन करावे.
मूल्यमापनामुळे मुलांना भीती, दडपण वाटणार नाही याची दक्षता घ्यावी.
प्रश्नपत्रिका वापरल्या
जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
२.७ संर्कालत मूल्यमापनासाठी साधने तयार करताना विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती,
सर्जनशीलता आणि बर्हुबध बुध्दीमत्तेला (१1॥॥॥॥॥९ 111012०1०९) वाव
ठेवावा. त्यासाठी आवश्यकतेनुसार मुक्तोत्तरी प्रश्नांचा (2001 [210९0
0९३॥ा$) उपयोग करावा. यांत्रिक प्रातसाद, घोकंपट्टी यावर भर देणाऱ्या आणि
स्मरणावर आधारित प्रश्नांना बाव देऊ नये.
२.८ संर्कालत मूल्यमापनाचे वेळापत्रक वर्ग / शाळा पातळीवर निश्चित करावे. मूल्यमापन
करताना वेळेबाबत लर्वाचकता ठेवावी.
२.९ मूल्यमापनातून निदर्शनास आलेल्या उल्लेखनीय बाबी तसेच वैयक्तिक गुणांची
आवजूंन दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन अशा गुणांच्या
विकासासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे.
२.९० अतिरिक्त पूरक मार्गदर्शन – संर्कालत मूल्यमापन करताना जे विद्याथी
संपादणुकीमध्ये मागे असल्याचे आढळून येईल अशा विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील
अडचणी / त्रुटींचा शोध घ्यावा व त्यानुसार वेळच्यावेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक
अथवा गटात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करुन त्यांना अपेक्षित संपादणूक
पातळीपर्यंत आणावे.
श्रेणी पद्धतीचा वापर
विद्यार्थ्यांना द्यावयाच्या प्रगतीपत्रकात विद्यार्थ्यांची विषयवार संपादणूक त्यांनी प्राप्त केलेल्या
गुणांवरुन खालील कोष्टकात दर्शीवल्यानुसार श्रेणीमध्ये लिहावी. सर्व विषयांची सरासरी काढून संकलित श्रेणी नोंदवू नये .
- विद्याथ्यांच्या प्रगतीपत्रकात शेक्षणिक प्रगतीचे वर्णनात्मक र्फालत नोंदवावे. तसेच त्यामध्ये
वैयक्तिक गुणांची (2५१11४) नोंद करावी. मूल्यमापन करताना सकारात्मक शेऱ्यांचा
वापर करावा. तसेच इतर विद्यार्थ्यांशी तुलना करू नये. पालकांना मुलांच्या प्रगतीबाबत
वेळच्यावेळी माहिती द्यावी. - जे विद्याथी मूल्यमापनाच्यावेळी अनुपस्थित राहतील त्यांचे पुन्हा मूल्यमापन करण्यात यावे.
- सर्व विद्यार्थी वरच्या श्रेणीकडे वाटचाल करतील यासाठी शाळा व शिक्षकांनी प्रयत्नशील
रहावे. विशेष करुन ‘ड’ व त्याखालील श्रेणीतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन
करुन किमान ‘क २’ श्रेणी पर्यंत आणणे हे शाळा व शिक्षकांवर बंधनकारक राहील. मात्र
अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच इयत्तेत ठेवता येणार नाही.
वरील मूल्यमापन कार्यपध्दती महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व
व्यवस्थापनाच्या मान्यता प्राप्त शासकीय, अनुदानित, विना अनुदानित आणि कायम विनाअनुदानित
प्रार्थामक व मार्ध्यामक शाळातील इयत्ता पहिली ते आठवी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना लागू राहील.
सदर www.maharashtra.gov.in at Get
स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक 2.01078 ! 01१ 3३4७1.
असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Dy
उपसचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,
मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
मा.उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
मा.मंत्री (शा.शि.) यांचे खाजगी सचिव
मा.राज्यमंत्री (शा.शि.) यांचे खाजगी सचिव
मा.मुख्यसचिव, महाराष्ट शासन
सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव / सचिव मंत्रालयीन विभाग .
मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर
महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र- १/२, मुंबई / नागपूर
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्चमाध्यमिक), म.रा.,पुणे
शिक्षण संचालक (ाथमिक), म.रा.,पुणे
संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
सर्व जिल्हाधिकारी,
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
सर्व आयुक्त, महानगरपालिका
सर्व मुख्याधिकारी, नगरपालिका / नगरपरिषद
सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
सर्व शिक्षणाधिकारी (प्रार्थामक/मार्ध्यामक),
सर्व प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, महानगरपालिका
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
निवड नस्ती- प्राशि-‘५