तलासरी तालुक्यातील तीन शिक्षकांचा  “वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराने” गौरव

<em>तलासरी तालुक्यातील तीन शिक्षकांचा  “वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराने” गौरव</em>
img 20221109 wa00083715018832332597099
पुरस्काराचे मानकरी

श्री . अनंता खुलात , श्री. सदाशिव भुरकुड , ज्ञानमाता विद्यालय, झरी आणि श्रीमती मनिषा किर्दत ,माध्यमिक विद्यालय , तलासरी यांचा गौरव

दिनांक ठाणे मंगळवार

८ नोव्हेंबर २०२२ रोजी तृप्ती बॅक्चेट, ४ था मजला, एम. एच. हायस्कूल, शिवाजी पथ, तालुका जिल्हा ठाणे पश्चिम या ठिकाणी समन्वय प्रतिष्ठान आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ आयोजन करण्यात आले होते.

fb img 16680056388737895388998385005613
fb img 16680056530728629292938197021153
fb img 16680056658746199444675990227796
fb img 16680056735668659909215272145013

यावेळी शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्यातील भरीव योगदानाबद्दल तलासरी तालुक्यातील तीन शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये  शाळेच्या स्थापनेपासून शाळेत कार्यरत असणाऱ्या, शाळेच्या प्रगतीमध्ये मध्ये ज्यांचे मोठे योगदान, विद्यार्थी प्रिय माध्यमिक विद्यालय तलासरी  *मनीषा किर्दत* *मॅडम* , आदिवासी समाज बांधवांच्या विविध रूढी परंपरा जतन करण्यासाठी प्रयत्न करणारे सामाजिक क्षेत्रात नेहमी उत्साहाने इतरांना मदत करणारे बालक मंदिर गिरगाव शाळा *अनंता खुलात सर* , कलेच्या क्षेत्रात स्वतः उतरून स्वतः रंगमंच गाजवणारे विद्यार्थी प्रिय, एक आदर्श शिक्षक ज्ञानमाता झरी  *सदाशिव* *भुरकूड सर*
यांना समन्वय प्रतिष्ठान आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

यावेळी प्रमुख पाहुणे आमदार कोकण पदवीधर मतदार संघ चे अॅड. मा. श्री. निरंजन वसंत डावखरे  यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
शाळेत विज्ञान प्रदर्शन, क्रिडा, विविध प्रकारचे स्पर्धा,   शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय व वैशिष्ट्ये पूर्ण कार्याची दखल घेऊन समन्वय प्रतिष्ठान या संस्थेकडून २०२२ चा   *वसंत स्मृती आदर्श शिक्षक* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.* याबद्दल शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी, पालक मित्रपरिवार सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *