भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ – महत्वाच्या सूचना

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ – महत्वाच्या सूचना

● राज्यात सर्व विभागीय / जिल्हा / उप विभागीय / तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा.

● विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व कोकण यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी.

राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल. पुणे येथे मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

● ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. सदर दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ वा. या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वा. च्या पूर्वी किंवा ९.३५ वा. च्या नंतर आयोजित करावा.

● राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅण्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवावा.

● यावेळी करण्यात येणाऱ्या भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विशद करणारा तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारे असावा.

● संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गांव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील.

● समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा.

● दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे :- वृक्षारोपण, आंतर शालेय/ आंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर Online पध्दतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा / देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धाचे आयोजन करावे. सोशल मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थी / विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे / भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखादया विषयाचा Webinar आयोजित करावा, एनएसएस व एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर Online मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व Digital माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा/ संदेश द्यावा.

● राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर (ग्रामीण भागात सुध्दा) तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबर्डी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.

● राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक: एफएलजी-१०९१/३०, दिनांक २० मार्च, १९९१ व क्रमांक एफएलजी-१०९१ (२)/ ३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ आणि परिपत्रक क्रमांक: एफएलजी १०९८/३४३/३०, दिनांक ११ मार्च १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

● खासदार, आमदार, जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडीलांना, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे.

● विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती हे त्यांच्या विभागीय मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. विभागीय आयुक्त, कोकण हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील. जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

● संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपापल्या अधिकारक्षेत्रात स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करण्यासंबंधी आवश्यक ती कार्यवाही कृपया करावी. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी या परिपत्रकात दिलेले निदेश योग्य प्रकारे पाळण्यात येतील, याची व्यक्तीशः दक्षता घ्यावी.

● आचारसंहिता अंमलात असल्यास खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत असून सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी: 

अ) ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये.

आ) कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करु नये.

■ हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय व तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *