दीन बंधू तू , गोपाला रे….मराठी प्रार्थना
दीनबंधु तू गोपाला रे
दीनबंधु तू गोपाला रे, कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना
तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता
तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता
दीनबंधु तू गोपाला रे, कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना, नंदनंदना रे मोहना
चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या, तू खरा सूत्रधार
चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या, तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळूनी आता
नवचेतना विश्वास दे आता
घे बालका सांभाळूनी आता
नवचेतना विश्वास दे आता
दीनबंधु तू गोपाला रे, कृपासिंधू तू नंदलाला रे
दीनबंधु तू गोपाला रे, कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना, नंदनंदना रे मोहना
कधी श्याम भोळा, कधी चक्रधारी
कान्हा देवकीचा, मिरेचा मुरारी
कधी श्याम भोळा, कधी चक्रधारी
कान्हा देवकीचा, मिरेचा मुरारी
गिरीधारी तू, तू बासुरीवाला
नवचेतना विश्वास दे आता
गिरीधारी तू, तू बासुरीवाला
नवचेतना विश्वास दे आता
दीनबंधु तू गोपाला रे, कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना, नंदनंदना रे मोहना