प्रधानमंत्री पोषण निर्माण शक्ती योजनेची दैनंदिन विद्यार्थी एमडीएम ॲप द्वारे किंवा वेबसाईटवर भरता येते परंतु कधीकधी आपण आपला पासवर्ड विसरतो कधी नेटवर्क चा प्रॉब्लेम येतो सदरील माहिती भरणे शक्य होत नाही…..

अशा वेळी काय करावे….. वाचा सविस्तर माहिती….
MDM ATTENDANCE WITH SMS GUIDE
MDM ATTENDANCE WITH SMS GUIDE
USER MANUAL FOR MDM
MDM-attendance with SMS मार्गदर्शिका
या सुविधेचा वापर करून शाळांना शालेय पोषण आहार योजनेची रोजची उपस्थिती व लाभार्थी संख्या प्रणालीला पाठवता येईल. हि सुविधा फक्त खालील कर्मचाऱ्यांना वापरता येईल. मात्र त्यांचे मोबाईल क्रमांक तालुकास्तरावरून सरल MDM मध्ये Update केलेले असले पाहिजेत.
१. मुख्याध्यापक
२. सहाय्यक मुख्याध्यापक
३. पर्यवेक्षक
४. शालेय पोषण आहाराचे काम पाहणारा शिक्षक



SMS चा विहित नमुना –
१. फक्त प्राथमिक शाळेकरिता : MH MDMM sc 27251108002, p1-5200, mc1-50, pu1-5 MD, ms1-5 195
२. फक्त उच्चप्राथमिक शाळेकरिता :
MH MDMM 1 sc 27251108002, p6-8100, mc6-80, pu6-8 MD, ms6-8 100
३. फक्त प्राथमिक व उच्चप्राथमिक शाळेकरिता :
MH MDMM 1 sc 27251108002, p1-5200, mc1-50, pu1-5 MD, ms1-5 195, p6-8100, mc6-80, pu6-8 MD, ms6-8 100
हा SMS 9223166166 या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात यावा.
सूचना –
हा SMS टाईप करताना वरील विहित नमुन्यात टाईप करण्यात यावा. जसे की Capital Letter, Small Letter जसेच्या तसे टाईप करावे.
SMS टाईप करताना MH आणि MDMM यामध्ये Space देण्यात यावा, म्म्म आणि SC यामध्ये सुद्धा Space
देण्यात यावा, p6-8 p1-5 mc6-8 mc1-5 हि अक्षरे व त्यानंतर येणारे अंक आणि त्यानंतर येणारा (,) यामध्ये
सुद्धा Space देण्यात यावा. एकूणच वरील SMS नमुन्याची सूक्ष्म पाहणी केली असता, ज्या ज्या ठिकाणी दोन्ही
अक्षरांमध्ये एकामध्ये Space दिल्याचे दिसून येत आहे. त्या प्रत्येक ठिकाणी आपण SMS तयार करताना Space
देण्याची खबरदारी घ्यावी. अन्यथा आपला SMS प्रणाली स्वीकारणार नाही याची नोंद घ्यावी.
SMS चा विहित नमुना –
फक्त प्राथमिक शाळेकरिता : असा msg करावा
MH MDMM sc 27251108002, p1-5200, mc1-50, pu1-5 MD, ms1-5 195
SMS चा विहित नमुना –
फक्त प्राथमिक व उच्चप्राथमिक शाळेकरिता :
MH MDMM 1 sc 27251108002, p1-5200, mc1-50, pu1-5 MD, ms1-5 195, p6-8100, mc6-80, pu6-8 MD, ms6-8 100
वरील SMS च्या विहित नमुन्यातील Short Code चा तपशील पुढील प्रमाणे-
अ.क्र.
१
Short Code
Sc
वर्णन
School Code
स्पष्टीकरण
शाळेचा ११अंकी U-Dise नंबर, म्हणजेच SC च्यापुढे Space देऊन शाळेचा ११ अंकी U-Dise नंबर नमूद करावा.
२
p1-5
Present
इयत्ता १ली ते ५वी मधील उपस्थित विध्यार्थी संख्या, म्हणजेच p1-5 च्यापुढे Space देऊन इयत्ता १ली ते ५वी मधील उपस्थित विध्यार्थ्यांची संख्या नमूद करावी.
3
mc1-5
Meal cooked
इयत्ता १ली ते ५वी करिता पोषण आहार शिजविला आहे, किंवा कसे, म्हणजेच mc1-5 च्यापुढे Space देऊन शून्य (0) अथवा १ ते ६ पैकी पोषण आहार न शिजविण्याचे कारण या पैकी एक क्रमांक नमूद करावा. सदरील अंकाचे अर्थ पुढील प्रमाणे-
0 = शालेय पोषण आहार शिजविण्यात आला आहे.
1 = स्वयंपाकी / मदतनीस अनुपस्थित होते.
2 = तांदूळ व धान्यादिमाल संपला.
3 = शालेय पोषण आहारासाठी देण्यात आलेले आगाऊ अनुदान संपले.
4 = स्नेहभोजन देण्यात आले.
5 = शाळेला स्थानिक सुट्टी.
6 = शाळेची सहल.
४
pu1-5
Pulses
इयत्ता १ली ते ५वी करिता त्यादिवशी शिजविण्यात आलेल्या पोषण आहाराच्या मेनूमध्ये वापरण्यात आलेला एक पदार्थ, म्हणजेच pu1-5 च्यापुढे Space देऊन पुढीलपैकी कोणताही एक Short Code नमूद करावा.
MD-मुगडाळ
TD-तुरडाळ
MSD-मसुरडाळ
MT-मटकी
MG-हिरवेमुग
CH-चवळी
HB-हरभरा
VT-वाटणा
५
ms1-5
Meal Served
इयत्ता १ली ते ५वी च्या किती विध्यार्थाना पोषण आहार देण्यात आला. म्हणजेच ms1-5 च्यापुढे Space देऊन इयत्ता १ली ते ५वी ची लाभार्थी संख्या नमूद करावी.
६
p6-8
Present
इयत्ता ६वी ते ८वी मधील उपस्थित विध्यार्थी संख्या, म्हणजेच p6-8 च्यापुढे Space देऊन इयत्ता ६वी ते ८वी मधील उपस्थित विध्यार्थ्यांची संख्या नमूद करावी.
७ mc6-8
Meal cooked
इयत्ता ६वी ते ८वी करिता पोषण आहार शिजविला आहे, किंवा कसे, म्हणजेच mc6-8 च्यापुढे Space देऊन शून्य (0) अथवा १ ते ६ पैकी पोषण आहार न शिजविण्याचे कारण या पैकी एक क्रमांक नमूद करावा. सदरील अंकाचे अर्थ पुढील प्रमाणे-
0 = शालेय पोषण आहार शिजविण्यात आला आहे.
1 = स्वयंपाकी / मदतनीस अनुपस्थित होते.
2 = तांदूळ व धान्यादिमाल संपला.
3 = शालेय पोषण आहारासाठी देण्यात आलेले आगाऊ अनुदान संपले.
4 = स्नेहभोजन देण्यात आले.
5 = शाळेला स्थानिक सुट्टी.
6 = शाळेची सहल.
वरील प्रमाणे सूचना वाचा….