बदली संदर्भात महत्वाचे update ग्रामविकास विभागाचे परिपत्रक 2024 निर्गमित

State Employee Transfer Update Shasan Paripatrak2024

कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 31 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .


रिट याचिका क्र.5258 / 2023  व अन्य याचिकांमध्ये मा.उच्च न्यायालय , नागपुर यांनी दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी पारित केलेल्या आदेशांमध्ये याचिका कर्त्या शिक्षकांना दुर्गम भागातुन सुगम भागात बदली मिळणेबाबत , सदर परिपत्रकांमध्ये माहिती देण्यात आलेली आहे .सदर परिपत्रकानुसार दिनांक 21.05.2024 व दिनांक 19.05.2024 रोजीच्या मे . बीन्सीस आय टी सर्विसेस प्रा.लि.पुणे यांना सादर करण्यात आलेल्या पत्राच्या संदर्भाधीन पत्रानुसार , उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने नमुद करण्यात येते कि , यातील मुद्दा क्र.01 Server Availability व 02 Renewal of SMS and Email Work Order बाबत ( शिक्षक ऑनलाइ्रन बदली पार्टल सुरु करण्यासाठी लागणारे हार्डवेअर आणि त्याच्या साठी येणारा एकुण 01 वर्षासाठीचा खर्च ) ..


या अनुषंगाने विभागाच्या स्तरावर कार्यवाही करण्यात येत असून याबाबत सदर मे.बीन्सीस आयटी सर्विसेस प्रा.लि . पुणे यांना कळवियात येईल , असे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच दरम्यान शिक्षक ऑनलाईन बदल्यांसाठी सर्वर अनुषंगिक बाबींची पुर्तता पोर्टल उपलब्ध करुन देण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत .
सदरची बाब ही तातडीची समजण्याची सुचित करण्यात आली आहे , तसेच मुद्दा क्र.03 व 04 बाबत जिल्हा परिषद अमारावती यांच्याकडून तातडीने माहिती उपलब्ध करुन घ्यावी , व जिल्हा परिषद , अमरावती यांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत . तसेच मुद्दा क्र.05 बाबत सध्या फक्त अमरावती जिल्हा परिषदेसाठी पोर्टल सुरु करण्याच्या सुचना शासनांच्या समक्रमांकीत दिनांक 15.05.2024 रोजीच्या पत्रानुसार देण्यात आलेल्या आहेत , त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .


या संदर्भात ग्राम विकास विभागांकडून दिनांक 31 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *