NAVODAYA ENTRANCE TEST PASSAGE 8
NAVODAYA ENTRANCE TEST PASSAGE 8
मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धाअधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री-शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामांत त्यांना मदत करीत आहेत.
1.मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व आहे; कारण –
(A) ते पशूनाही मानव बनवते.
(B) ते त्यांच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते.
(C) ते राष्ट्राचा विकास करते.
(D) ते स्त्रियांसाठी अत्यावश्यक आहे.
2. स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत जरुरीचे आहे; कारण
(A) जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते.
(B) स्त्रियांना काम करणे आवडते.
(C) फक्त स्त्रियाच समाजातील वाईट गोष्टी नाहीशा करू शकतील.
(D) निसर्गतःच स्त्रिया अंधश्रद्धाळू असतात
1. शिक्षणाशिवाय मानव हा पशूप्रमाणे आहे; कारण –
(A) तो परिश्रम करीत नाही.
(B) तो अंधश्रद्धाळू राहतो.
(C) तो स्वतःचा चरितार्थ चालवू शकत नाही.
(D) त्याच्या मानसिक शक्तींचा विकास होत नाही.
4. स्त्री-शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत ?
(A) मुली शाळेत जाऊ लागल्या आहेत.
(B) अंधश्रद्धा व वाईट चालींचा वेगाने नाश होत आहे.
(C) स्त्रियांना नोकऱ्या मिळत आहेत.
(D) स्त्रिया पुष्कळ पैसा मिळवत आहेत.
5. जबाबदार कामात पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करीत आहेत; कारण
(A) त्या अंधश्रद्धाळू आहेत.
(B) त्या पुष्कळ पैसा मिळवत आहेत.
(C) त्या सुशिक्षित आहेत.
(D) त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत.