MDM BILL 2024 :  OFFLINE BILL FOR SCHOOL

प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना 2024 अनुदान offline पद्धतीने मिळणार…

प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना 2024 अनुदान offline पद्धतीने मिळणार…

MDM BILL 2024 :  OFFLINE BILL FOR SCHOOL

दि. /०४/२०२४.

जा.क्र. प्राशिस/ऑनलाईन/२०२४/03251

प्रति,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व

23 APR 2024

विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांच्या ऑफलाईन देयकांच्या माहिती बाबत. संदर्भः शासन निर्देश क्रः शापोआ-२०१८/प्र.क्र. १५३/एस.डी. ३ दि. १३.०३.२०२४.



प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती राज्यामधील प्रत्येक जिल्हयातील शाळांनी शासनाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. तथापि अनेक शाळांना विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणामुळे विहित वेळेत दैनंदिन उपस्थितीची माहिती भरता आलेली नसल्यामुळे अशा शाळांना एमडीएम पोर्टलमार्फत जनरेट करण्यात आलेल्या ऑनलाईन देयकांचा लाभ मिळालेला नाही.



त्यानुषंगाने सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, सदर योजनेंतर्गत काही शाळांनी विहित वेळेत ऑनलाईन माहिती भरलेली नसल्यामुळे, अशा शाळांनी आहार शिजवून देखील संबंधित शाळांना अनुदान मिळालेले नाही, अशा शाळांची माहिती खालील विहित नमुन्यामध्ये संचानालयास दि. ०८.०४.२०२४ पर्यंत विनाविलंब सादर करण्यात यावी. सदर माहिती सादर करतांना प्रस्तुत संस्थांना देय रक्कम नियमानुसार देय असलेबाबतचे प्रमाणपत्र व कोणत्याही देयकाची दुबार अदायगी होत नसलेबाबतचे प्रमाणपत्र देखील सोबत सादर करण्यात यावे. सदर बाबत विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.



सोबत : परिशिष्ठ – अ

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *