विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे PAT – 3 माहिती भरताना वारंवार उन्द्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे
VSK PAT3 QUESTION AND SOLUTIONS
समस्या १ – Invalid U-DISE कोड
आपल्या शालार्थ पोर्टलवर शाळेचा UDISE कोड बरोबर असल्याची खात्री करा. चुकीचा UDISE कोड असल्यास मुख्याध्यापक / DDO-१ यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षणअधिकारी/DDO-२ यांनी approval घेण्यात यावे.
तरीही प्रश्न सुटत नसल्यास तालुका समग्र शिक्षा डेटा ऑपरेटरशी संपर्क करुन UDISE कोडची पडताळणी करावी.
सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक मुख्याध्यापक / DDO-१ यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षणअधिकारी / DDO-२ यांनी approval दिल्यानंतर किमान ८ दिवस प्रतिक्षा करा.
समस्या ३ – Invalid शालार्थ / शिक्षक आय.डी.
मुख्याध्यापक / DDO-१ यांच्याकडून शालार्थ पोर्टलवरून अचूक शिक्षक आय. डी. प्राप्त करून घ्यावा.
समस्या ४ – शून्य शिक्षक असलेली शाळा
सध्या माहिती भरू नये. अधिकृत शिक्षक नेमणुकीनंतर माहिती भरावी.
समस्या ५ – सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत किंवा पूर्वीच्या शिक्षकांची नावे .
शालार्थ पोर्टल व UDISE प्लसवर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी.
समस्या ६ मागील वर्गातील विद्यार्थ्यांची नावे दिसत आहेत.
विद्यार्थ्यांचे सरल पोर्टलवर पुढील वर्गात प्रमोशन करावे व यादी अपडेट करावी.
समस्या ७ – शिक्षण हमी कार्ड दिलेले विद्यार्थी
विद्यार्थ्यांची सरल पोर्टलवर New Tab घेऊन इयत्तनिहाय नोंद करावी. New Tab करता तालुका समग्र शिक्षा ऑपरेटरशी संपर्क करावा.
समस्या ८ – सर्व विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत
आपल्या वर्गातील मुलांची नावे सरल व UDISE पोर्टलवर अद्ययावत करावी. त्यानंतर यादी उपलब्ध होईल.
दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांची सरल पोर्टलवर त्या शाळेत ट्रान्स्फर करावी.
समस्या ९ – केवळ शालार्थ प्रणालीमध्ये वेतन
सध्या केवळ शालार्थ प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना सदर माहिती भरता येते. आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाच्या शाळा, सराव पाठशाळा, आदिवासी विभागाच्या शाळा, OBC कल्याण व मदरसा इ. शाळांना सध्या
सदर माहिती भरण्यास Access देण्यात आलेले नाहीत. याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
टीप : आपल्या शाळेतील कोणत्याही शिक्षकाचे लॉग इन होत असेल तर त्यांच्या लॉग इन वरून सर्व इयत्तांची माहिती भरावी.
आम्हाला आशा आहे की वरील उत्तरांनी आपल्या शंकांचे समाधान झाले असेल. पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा ।
विद्या समीक्षा केंद्र, पुणे