Mahatma Phule : Which are the 18 Schools Started by Mahatma FULE??

Mahatma Phule : Which are the 18 Schools Started by Mahatma FULE??

daily design 70131p7t15t0b0917515325330424921

Mahatma Phule Death anniversary : ज्योतिराव गोविंदराव फुले हे १९ व्या शतकातील एक महान विचारवंत, समाज सेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांना महात्मा फुले या नावानेही ओळखले जातात. त्यांनी अनिष्ट चालीरितींमध्ये गुरफटलेल्या महिलांसाठी शिक्षणाचा पुरस्कार करून त्यांच्यासाठी प्रगतीची दारे खुली केली.

Mahatma Phule : महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या १८ शाळा कोणत्या?
Mahatma Phule : महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या १८ शाळा कोणत्या?

Mahatma Jyotiba Phule Death Anniversary :स्त्री शिक्षणाचे पाया रचणारेथोरक्रांतिकारक विचारवंत, महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे. २८ नोव्हेंबर १८९० रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं होती. जाणून घेऊया त्यांनी आपल्या जीवनात सुरू केलेल्या शाळा..

Mahatma Jyotiba Phule
Mahatma Jyotiba Phule

Mahatma Phule Death anniversary : ज्योतिराव गोविंदराव फुले हे १९ व्या शतकातील एक महान विचारवंत, समाज सेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांना महात्मा फुले या नावानेही ओळखले जातात. त्यांनी अनिष्ट चालीरितींमध्ये गुरफटलेल्या महिलांसाठी शिक्षणाचा पुरस्कार करून त्यांच्यासाठी प्रगतीची दारे खुली केली.

ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले. ज्योतिरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब पेशव्यांसाठी फुले विक्रेते म्हणून काम करत होते. त्या काळात स्त्रीविरोधी दुष्कृत्ये मोठ्या प्रमाणावर होती.

महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांनी महिलांना मुक्तपणे जगता यावे यासाठी परंपरावादी विचारांना तिलांजली देत समाजात सुधारणा घडवून आणली.

बालविवाह, महिला आणि विधवांचे शोषण सर्रास होते. पण ज्योतिराव फुले यांनी स्त्रीविरोधी कुप्रथा आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवला. महिलांसाठी शाळाही उघडली.

महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात १८४८मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्यामुळं त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यांच्या वडिलांनीही त्यांना घराबाहेर काढलं. मात्र तरीही त्यांनी हा विरोध झुगारुन रास्तापेठ आणि वेताळपेठेत १८५१ ला पुन्हा मुलींसाठी दोन शाळा सुरू केल्या. त्यांच्या या कार्यामुळं त्यांचा १८५२ला ब्रिटीशांच्या शिक्षण विभागाच्या वतीनं मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली गौरव करण्यात आला.
महात्मा फुलेंनी कोणत्या व कधी सुरू केल्या शाळा?
भिडेवाडा पुणे (१ जानेवारी १८४८)
महारवाडा पुणे (१५ मे १८४८)
हडपसर पुणे (१ सप्टेंबर १८४८)
ओतूर पुणे जिल्हा (५ डिसेंबर १८४८)
सासवड, पुणे जिल्हा (२० डिसेंबर १८४८)
अल्हाटांचे घर, पुणे (१ जुलै १८४९)
नायगाव, ता. खंडाळा, जिल्हा सातारा. ( १५ जुलै १८४९)
शिरवळ, ता. खंडाळा, जिल्हा सातारा (१८ जुलै १८४९)
तळेगाव ढमढेरे, जिल्हा पुणे (१ सप्टेंबर १८४९)
शिरुर जिल्हा पुणे (८ सप्टेंबर १८४९)
अंजीरवाडी माजगाव (३ मार्च १८५०)
करंजे, जि. सातारा (६ मार्च १८५०)
भिंगार (१९ मार्च १८५०)
मुंढवे जिल्हा पुणे (१ डिसेंबर १८५०)
अण्णासाहेबांचा वाडा, पुणे ( ३ जुलै १८५१)
नाना पेठ, पुणे (१७ सप्टेंबर १८५१)
रास्ता पेठ, पुणे (१७ सप्टेंबर १८५१)
वेताळपेठ, पुणे (१५ मार्च १८५२)

महात्मा फुलेंनी तब्बल १३ शाळा या पुणे शहर व जिल्ह्याच्या ठिकाणी उघडल्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *