राज्य पात्रता परीक्षा (सेट) २०२४ परीक्षेच्या तारखेची घोषणा SET 2024 EXAMINATION

राज्य पात्रता परीक्षा (सेट) २०२४ परीक्षेच्या तारखेची घोषणा यापूर्वी करण्यात आलेली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे अर्ज प्रक्रियेचा सविस्तर तपशील जारी करण्यात आला आहे.
त्यानुसार शुक्रवार (ता.१२) पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात होणार आहे. (SET Exam application form starts from Friday nashik news)
३९ व्या एम-सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ७ एप्रिलला ही परीक्षा महाराष्ट्रासह गोव्यात घेतली जाणार आहे. परीक्षेच्या नोंदणीसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आठशे रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना साडेसहाशे रुपये इतके शुल्क आहे.
यंदाच्या वेळी शेवटची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असून, यापुढील परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत.
पेपर क्रमांक एक हा गणित, सामान्यज्ञानासह इतर विषयांवरील प्रश्नांवर आधारित असेल. तर पेपर क्रमांक दोन विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विशेष विषयाचा असणार आहे.
सेट परीक्षेसाठी महत्त्वाच्या तारखा अशा-
- नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत——१२ ते ३१ जानेवारी
- विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत———१ ते ७ फेब्रुवारी
- ऑनलाइन अर्जात दुरुस्तीची मुदत————-८ ते १० फेब्रुवारी
- प्रवेशपत्र उपलब्धतेची संभाव्य दिनांक———-२८
मराठी जाहिरात वाचा


फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट
https://setexam.unipune.ac.in/