माहे डिसेंबर 2023 वेतन देयक बाबत आत्ताची मोठी अपडेट , शासन परिपत्रक निर्गमित दि.20.12.2023

State Employee Payment & Pay Commission Remain Installment Paripatrak ] : माहे डिसेंबर 2023 चे वेतन देयके 7 वा वेतन आयोग तिसरा हप्ता ( राहीलेल पहिला हप्ता व दुसरा हप्ता ) पारित करण्याबाबत , राज्य शिक्षण निरीक्षाक कार्यालय बृहन्मुंबई , उत्तर विभागांकडून दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार , माहे डिसेंबर 2023 चे ऑनलाईन देयक सातवा वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यासह अदा करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच क्षेत्रिय स्तरावर तांत्रिक कारणास्तव / शाळांनी देयके सादर न केल्याने , सन 2022-23 मध्ये अदा करावयाचा राहीलेला सातवा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणेसाठी परवानगी देण्यात आलेली आहे
सातवा वेतन आयोगाचे हप्ते अदा करताना तो वेतन देयका सोबत अदा करावा लागत असल्याने , माहे डिसेंबर 2023 च्या वेतनासोबत अदा करणेसाठीचे आदेश देण्यात आलेले आहेत . तसेच मा.शिक्षण संचालक यांच्या संदर्भिय पत्रात दिलेल्या निर्देशानुसार , सदर विभागातील लेखाशीर्ष 22020442 व 220204778 या लेखाशिर्षामध्ये माहे डिसेंबर 2023 चे वेतन देयक सातवा वेतन आयोगाचा राहीलेला पहिला व दुसरा हप्ता तसेच नियमित देय असलेला तिसरा हप्त्यासह अदा करणे करीता …
शिक्षण निरीक्षक कार्यालय मार्फत तात्काळ देयकांमध्ये योग्य ते बदल करुन अचूक वेतन देयके दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तसेच भविष्यांमध्ये सातवा वेतन आयोगाचा पहिला , दुसरा , तिसरा हप्त्याबाबत तक्रारी उद्भवल्यास सदरचे कार्यालय जबाबदार राहणार नसल्योच तसेच त्याबाबतची जबाबदारी संबंधित नमुद प्राचार्य / मुख्याध्यापक यांच्या असेल , असे निर्देश देण्यात आलेले आहेत .