
राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवामध्ये मृत्यु झाल्यास त्याच्या नातेवाईकास मृत्यु उपदान देण्याची तरतुद आहे , सदर उपदानाची रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीनुसार अदा करण्यात येत असते . सेवा कालाधी व मिळणारे मृत्यु उपदानाचे दर पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सेवेच्या कालावधीचे पाच टप्पे करण्यात आलेले आहेत . यांमध्ये कर्मचाऱ्यांची सेवा ही 01 वर्षापर्यंत असल्यास , अशा कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अंतिम वेतनाच्या दुप्पट रक्कम मृत्यु उपदान म्हणून अदा करण्यात येते . तर कर्मचाऱ्यांची सेवा ही 01 ते 05 वर्षादरम्यान असताना मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांस अंतिम वेतनाच्या 6 पट इतकी रक्कम मृत्यु उपदान म्हणून अदा करण्यात येते .
तर कर्मचाऱ्यांची सेवा ही 05 ते 11 वर्षे दरम्यान असताना मृत्यु झाल्यास अंतिम वेतनाच्या 12 पट इतकी रक्कम मृत्यु उपदान म्हणून अदा करण्यात येते . तर कर्मचाऱ्यांची सेवा 11 वर्षापेक्षा जास्त व 20 वर्षापर्यंत असताना मृत्यु झाल्यास , त्यांच्या नातेवाईकांस अंतिम वेतनाच्या 20 पट इतकी रक्कम सेवा उपदान म्हणून अदा करण्यात येते .
तर कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्षांपेक्षा अधिक असताना मृत्यु झाल्यास अशा वेळी कर्मचाऱ्यांच्या नोतेवाईकांस सेवा पुर्ण केलेल्या प्रत्येक सहामाहीकरीता अंतिम वेतनाच्या 50 टक्के मात्र 33 महिन्यांचे वेतन अथवा 14 लाख रुपये इतकी रक्कम मृत्यु उपदान अदा करण्यात येते .
अ.क्र सेवा कालावधी मृत्यु उपदानाचे दर
- 20 वर्षांपेक्षा जास्त 14 लाख रुपये
- 11 ते 20 वर्षे पर्यंत अंतिम वेतनाच्या 20 पट
- 05 ते 11 वर्षे पर्यंत अंतिम वेतनाच्या 12 पट
- 01 ते 05 वर्षे पर्यंत अंतिम वेतनाच्या 06 पट
- 01 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या 02 पट