राज्य कर्मचाऱ्यांना एवढ्या वर्षाच्या सेवेनंतर मिळते , पुर्ण सेवानिवृत्ती वेतन ! जाणून घ्या निवृत्तीवेतनाचे प्रकार व सविस्तर नियमावली !

राज्य कर्मचाऱ्यांना एवढ्या वर्षाच्या सेवेनंतर मिळते , पुर्ण सेवानिवृत्ती वेतन ! जाणून घ्या निवृत्तीवेतनाचे प्रकार व सविस्तर नियमावली !

राज्य कर्मचाऱ्यांना एवढ्या वर्षाच्या सेवेनंतर मिळते , पुर्ण सेवानिवृत्ती वेतन ! जाणून घ्या निवृत्तीवेतनाचे प्रकार व सविस्तर नियमावली !

screenshot 2023 12 25 23 54 20 42 40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b127737803710494425632
Pension Types राज्य कर्मचाऱ्यांना एवढ्या वर्षाच्या सेवेनंतर मिळते , पुर्ण सेवानिवृत्ती वेतन ! जाणून घ्या निवृत्तीवेतनाचे प्रकार व सविस्तर नियमावली !

State Employee Pension Rules ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत , सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात , प्रथम म्हणजे नियम वयोमान नुसार निवृततीवेनत ( नियम 62/63 ) आणि दुसरा म्हणजे पुर्ण सेवा निवृत्ती वेतन ( नियम 64 ) होय .

नियत वयोमानानुसार निवृत्तीवेतन : सेवा निवृत्तीकरीता जी कमाल वयोमर्यादा ठरविण्यात आलेली आहे , सदर वय पुर्ण झाल्याच्या नंतर कर्मचाऱ्यांस निवृत्ती केले जाते . म्हणजेच राज्य शासन सेवेतील गट अ ,ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांना वयाच्या 58 वर्षांच्या नंतर तर संवर्ग ड मधील कर्मचाऱ्यांस 60 वर्षांच्या नंतर सेवानिवृत्त केले जाते . सदर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांस मिळणारे निवृत्तीवेतन म्हणजे नियम वयोमान ( सुपर ॲन्युएशन ) निवृत्ती वेतन होय .

पुर्ण सेवा निवृत्ती वेतन ( नियम 64 ) : राज्य शासन सेवेतील कर्मचारी हा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षे पुर्ण झाल्याच्या नंतर , पण नियत वयोमान पुर्ण होण्याच्या अगोदर शासनांस 3 महिन्यांची नोटीस देवून अथवा शासनांने कर्मचाऱ्यांस 3 महिने अगोदर नोटीस देवून सेवानिवृत्त केल्यास सदर कर्मचाऱ्यांस पुर्ण सेवानिवृत्ती लागु करण्यात येते . हे प्रमाण राज्यातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाच्या 55 वर्षे पुर्ण झाल्याच्या नंतर आणि राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संदर्भात 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनांस तीन महिन्यांची नोटीस देवून / शासनांकडून सदर अधिकाऱ्यांस 03 महिन्यांची नोटीस देवून सेवानिवृत्त करु शकतात . त्यानंतर पुर्ण सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ लागु करण्यात येईल .

नियम 66 प्रमाणे स्वेच्छा सेवानिवृत्ती : कर्मचाऱ्यांची राज्य शासन सेवेत 20 वर्षांची अर्हताकारी सेवा पुर्ण झाली आहे , असे कर्मचारी राज्‍य शासनांस तीन महिन्याची नोटीस देवून सेवानिवृत्ती स्वीकारु शकतात , अशा प्रकारची सेवानिवृत्ती स्विकारल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये शासनांकडून कमाल 05 वर्षांची वाढ करण्यात येते . ही वाढ 33 वर्षांपेक्षा अधिक होणार नाही अशा प्रमाणात वाढ करण्यात येत असते .

म्हणजे जर कर्मचाऱ्यांने अर्हताकारी सेवेच्या 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास , त्या कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये कमाल 05 वर्षांची वाढ लागु करण्यात येईल म्हणजेच 25 वर्षांची सेवा ग्राह्य धरुन सेवानिवृत्तीवेतनाचे लाभ अनुज्ञेय करण्यात येईल .तर कर्मचाऱ्यांने अर्हताकारी सेवेच्या 29 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये 04 वर्षांची वाढ , म्हणजेच 33 वर्षे सेवा ग्राह्य धरुन पुर्ण सेवानिवृत्ती वेतनाची लाभ लागु करण्यात येईल .

अशा प्रकरणांमध्ये सेवानिवृत्तीनंतर पुर्ण निवृत्ती वेतन व इतर लाभ ( निवृत्ती वेतन उपदान , अंशराशीकरण , कुटुंब निवृतती वेतन इ. आर्थिक लाभ ) सर्व लाभ मंजूर करण्यात येतील .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *