पायाभूत स्तर : राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा २०२३ वर प्रतिक्रिया देणेसाठी मुदतवाढ

पायाभूत स्तर : राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा २०२३ वर प्रतिक्रिया देणेसाठी मुदतवाढ

महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

पायाभूत स्तर: राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा २०२३ तज्ञांमार्फत परिषद स्तरावर तयार करण्यात आला असून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी परिषदेच्या https://www.maa.ac.in/ या संकेत स्थळावर ठेवणेत आलेला असून प्रतिक्रिया देणेसाठी दिनांक ४ नोव्हेंबर, २०२३ पर्यंत मुदतवाढ देणेत येत आहे.

Screenshot 2023 11 02 13 04 11 27

मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक प्रशासक यांनी आपले अभिप्राय दि.४/११/२०२३ पर्यंत प्राध्यान्याने https://tinyurl.com/SCF-FS-Responses लिंकवर नोंदवावेत अथवा मेलद्वारे (scffsresponces@maa.ac.in ) वा पोस्टाने पाठवावेत. असे आवाहन संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे याद्वारे करीत आहेत.

टीप: पोस्टाने अभिप्राय पाठवित असल्यास त्यावर राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३ (पायाभूत स्तर) अभिप्राय, असे ठळक अक्षरात लिहून बालशिक्षण विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 708, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे- 411030 या पत्त्यावर पाठवावेत.

(अमोल येडगे, भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *