विभाग I
प्रथम भाषा
प्रश्न 1 ते 3 साठी सूचना – खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.
मायाला दोन बहिणी होत्या. तिच्या आईला या तिघींनाही शिकवून स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. मायाचे वडील
सतत आजारी असत, त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागत. तिने दुसऱ्यांचे कपडे शिवून अर्थार्जन केले. खूप कष्ट केले पण
मुलींच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही.
प्राथमिक शाळा महानगरपालिकेची असल्याने शालेय खर्चाचा प्रश्न नव्हता. त्यातून मायाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले होते. मायाने खूप जिद्दीने अभ्यास करून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. तिचे देदिप्यमान यश म्हणजे ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. दोन वर्षे नोकरी करून पैसे जमवले. जर्मनीला जाऊन पुढील शिक्षणही पूर्ण केले. परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले. “शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर.” माया आणि मायाची आई यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
- पैसे मिळविण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले ?
(1) शिवणकाम
(2) धुणीभांडी
(3) नोकरी
(4) भाजीविक्री
‘माया हुशार मुलगी होती.’ हे पुढीलपैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही ?
(1) तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले
(2) ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली
(3) तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले. (4) तिचे वडील सतत आजारी असत.
- मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते ?
(1) मुलींना शिकवले
(2) मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले
(3) खूप कष्ट केले
(4) मुलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले