उन्हें उतरणीला लागली पक्षी घराकडे परतू लागले झाडावरदेखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती. त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले, की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा अगोदर ते तर बिचकले. मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्याभोवती घिरट्या घातल्या किलबिलाट केला, पण चेंडू कसला वस्ताद ! तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही. त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरूपद्रवी समजून कुणी त्रास देणार नाही.
scholarship examination std five
पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे ?
(1) सकाळ
(2) दुपार
(3) रात्र
(4) संध्याकाळ
‘आगंतुक पाहुणा’ कोण आहे ?
(1) चेंडू
(2) दुसरा पक्षी
(3) घरटे
(4) निरुपद्रवी प्राणी
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उताऱ्यात आला नाही?