Cluster School Activity

Cluster School Activity

समूह शाळा विकसीत करणेबाबत

cluster school activity

विषयः विद्यार्थी गुणवत्तेसाठी समूह शाळा विकसीत करणेबाबत

राज्यामध्ये विविध व्यवस्थापनामार्फत साधारणतः १ लाख १० हजार शाळा चालविल्या जातात त्यापैकी सुमारे ६५ हजार शाळा या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविल्या जातात. राज्यातील प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासोबतच राज्यातील प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठीही शासन प्रयत्न करत आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी राज्यातील भौगोलिक क्षेत्र लक्षात घेवून शासनाने राज्यातील अतिशय दुर्गम भागातील गाव, वाडी, वस्ती या ठिकाणीही शाळांची निर्मीती केली आहे.

Cluster School Activity

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे सामाजिकीकरण होण्यासाठी, त्याच्यामध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होण्यासाठी, त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी, विविध शैक्षणिक साधनसामग्री उदा, दृक-श्राव्य साधने, क्रीडांगण, खेळांची मैदाने व पुरेशा प्रमाणात सह अध्यायी सोबत असणे आवश्यक आहे. कमी पटाच्या शाळांमध्ये या सर्व बाबींची अनुपलब्धता असल्याने याचा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर व विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. केवळ शाळेची स्वतच्च्या गावात असलेली उपलब्धता सोडली तर मूले खन्या शैक्षणिक गुणवत्तेपासून वंचित राहिल्याचे दिसते.

Standard five Scholarship

या सर्व बाबींचा सारासार विचार करून मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी व पुरेशा शैक्षणिक सुविधा प्रत्येक मुलास मिळाव्यात या उद्देशाने नंदुरबार येथील तोरणमाळ व पुणे जिल्ह्यातील पानशेत या दोन्ही ठिकाणी समूह शाळांचा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आता राज्यातील इतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील छोटया शाळांचा विशेषतः आदर्श शाळांचा कमी पटाच्या शाळा जोडण्यासाठी सोबत जोडलेल्या पत्रातील मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत.

5TH SCHOLARSHIP ( PUP/HSS SCHOLARSHIP): https://www.youtube.com/playlist?list=PLvE2_y3Ydicn5uOJwsvY7q1zykL4luabT

समूह शाळा निर्माण करण्यामागे राज्य शासनाचा शाळा बंद करणे किंवा शिक्षकाची पदे कमी करणे हा उद्देश नाही. तर गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात व त्यांच्यामध्ये शिक्षणातील विविध अध्ययन क्षमता विकसित होण्यास वाव मिळावा हा यामागील प्रमुख उद्देश आहे. या पत्रासमवेत पानशेत जिल्हा पुणे यांचा समूह शाळेबाबत प्रस्ताव यासोबत उदाहरणादाखल उपलब्ध करून दिला आहे. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी आपल्या जिल्हयातील कमी पटाच्या सर्व शाळांचा विचार करून त्यापैकी शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव सोबतच्या नमुन्यात देण्यात यावेत .

IMG 4761

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *