पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेबाबत
PAT MAHARASHTRA TEST
PAT पायाभूत चाचणी २०२३-२४

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, 708, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे- 411030
020-24426938
PAT MAHARASHTRA TEST
email ( evaluationdentamaa.ac.in.
जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन / पायाभूत चाचणी- VSK / २०२३-२४ / 04410 दि. १९/०९/२०२३
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व), २) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई मनपा,
३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम), ४) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प (सर्व),
विषय: पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत…..
संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन / पायाभूत चाचणी / २०२३-२४/३६७५.
दि. ०८/०८/२०२३
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन / पायाभूत चाचणी / २०२३-२४/३६७५.
दि.१३/०९/२०२३
वरील विषयान्वये STARS प्रकाल्पामधील SIG २ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्याथ्र्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे..
PAT MAHARASHTRA TEST
उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम) गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते.
संदर्भ क्र. २ नुसार विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात
आलेल्या आहेत. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२:०० ते ०५:३० या कालावधीत यु-ट्युबद्वारे प्रशिक्षणही शिक्षकांना देण्यात आलेले आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर २०१३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत कळविण्यात आले होते.
तथापि याबाबत अद्यापही पाहिजे प्रतिसाद दिसून येत नाही. तरी सदर बाबत प्राध्यानाने घेवून दि. पर्यंत इयत्ता तिसरी ते आठवी शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्याचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटचटच्या बाबतीत तांत्रिक मदतीसाठी श्री.
पैकटेश अनंतरामन ८०००४९४७६४ यांचेशी संपर्क करण्यात यावा. तरी आपल्या अधिनस्थ शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक
कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे. यू-ट्यूब लिंक : https://www.youtube.com/live/oC0gFdpooV0?si=18vatwfwV7tNslrk
PAT चाटबॉट मार्गदर्शिका https://bit.ly/PATManual
(असील येडगे मा.प्र.से.)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे