पायाभूत चाचणी गुण नोंदणी ऑनलाईन प्रशिक्षण बाबत ..
🔹 अत्यंत महत्वाचे 🔹
विषय : – पायाभूत चाचणी गुण नोंदणी ऑनलाईन प्रशिक्षण बाबत ..
वरील विषयान्वये आपणास कळविण्यात येते की , STARS प्रकाल्पामधील SIG – २ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षात राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा – इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते.त्यानुसार विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी चॅटबॉट वर कसे नोंदवावेत या बाबत दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२:०० ते ०१:३० या कालावधीत यु-ट्युबद्वारेऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे तरी सदर प्रशिक्षणासाठी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात यावे.
यु-ट्यूब लिंक : – https://www.youtube.com/live/oC0gFdpOOV0?si=18vatwfwV7tNslrk PAT
