पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी बापराबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना…सन 2023 -24

पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी बापराबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना…सन 2023 -24

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
“बालभारती’, सेनापती बापट मार्ग, पुणे – ४११ ००४.
(दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५६५९४६५ फॅक्स क्रमांक : ०२०- २५६५६०४६)

परिपत्रक

विषय : पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी बापराबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना…
शालेय बर्ष २०२३-२४ साठी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-
२२/प्र.क्र.२१६/एसडी-४, दिनांक ८ मार्च २०२३ नुसार पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश केलेला आहे . ही पृष्ठे ‘माझी नोंद’ या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पद्धतीने चार भागांत पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेली आहेत. या

पाठ्यपुस्तकांतील पृष्ठांचा प्रभावी व सुयोग्य वापर होण्याच्या हेतूने शिक्षकांसाठी हे परिपत्रक निर्गमित करत आहोत.

खालील सूचनांचे पालन सर्व शिक्षकांनी वर्गकार्यादरम्यान होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दयावे.

  • या पानांचा वापर, सर्वसाधारणपणे खालील स्वरूपाच्या नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यासाठी करता येईल.
  • प्रत्येक विदयार्थ्यांच्या ‘माझी नोंद’ यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये.
  • विद्यार्थ्यांनी तारीखवार नोंदी कराव्यात.
  • वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी
  • महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेण्यासाठी
  • वर्गात सूचवलेले अधिकचे प्रश्‍न नोंदवण्यासाठी
  • काही संदर्भ, वर्तमानपत्रांत विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती /साहित्यांची नोंद घेणे.
  • पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे, माध्यमे इत्यादींद्‌वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितीची पाठ्यपुस्तकांबाहेरील
  • माहिती लिहून ठेवण्यासाठी.
  • पाठ्यपुस्तकांबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद घेणे.
  • अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्‍न लिहिणे.
  • . चित्रकृती, चित्र, आलेख, आकृत्या काढण्यासाठी
  • . पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी
  • . कच्चे काम (पेन्सिलने), सूत्रलेखन, महत्त्वाचे संबोध, गणित सोडवण्याची बेगळी रीत मांडणे, पाढे तयार करणे,
  • पडताळणी करणे इत्यादी.
  • . नियम, सूत्रे, घटना, संबंध, घटनाक्रम आकृत्या, ओघतक्ता, संकल्पनाचित्र, मुक्‍तोत्तरी प्रश्‍नांची नोंद,
  • तुलनात्मक नोंदी, व्यावहारिक अनुभव विश्‍वातील उदाहरणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद, स्वनिर्मित
  • उदाहरणांची नोंद
  • शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्य्रचार, जोडशब्द, म्हणी, भाषिक खेळ, भाषिक सौंदर्य
  • असणारी ATH, व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे, महत्त्वाचे जोडशब्द, विरूद्धार्थी, समानार्थी शब्द,
  • सुविचार, सुभाषित, shear, भाषिक खेळ, इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे.
  • सहसंबंध लावण्यासाठी, महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी, विस्तारित अर्थ नोंदवणे.
  • रेखाकाम, ठसेकाम, चित्रकाम (इयत्ता पहिली ते पाचवीसाठी)
  • विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सूचलेल्या स्वत:च्या उदाहरणांच्या नोंदीसाठी
  • विषय शिकताना इतर विषयाशी आलेल्या सहसंबंधाची नोंद
  • गृहकार्य लिहून घेण्यासाठी
  • . अध्ययन करताना आलेल्या शंका लिहून ठेवण्यासाठी

या उपक्रमाचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे, हे विचारात घेऊन या पानांचा अत्यंत प्रभावी बापर होईल असे पाहावे :-

एकच पाठ्यपुस्तक शाळेत न्यावे लागेल त्यामुळे CRT Sg) कमी होण्यास मदत होईल.
पाठ्यपुस्तकांचे स्वयंअध्ययन करताना या नोदींचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल.

नोंदीचा वापर त्याला स्वयंअध्ययनासाठी करता येईल, त्यामुळे प्रत्याभरण(9१८८८१५८1) ब टुढीकरण (1:
होईल.

४. विदयार्थ्यांना स्वत:च्या शब्दांमध्ये स्वतःच्या नोंदी करता येतील व ही सवय त्यांच्या अंगवळणी पडेल.

५. शिक्षकांनी दिलेली उदाहरणे विदयार्थ्यांना ‘माझी नोंद’ यामध्ये नोंदवता येतील.

६. त्यांचे स्वत:चे सुलभ संदर्भ साहित्य तयार होईल.

७. स्वतःचे मुद्दे विदयार्थ्यांना काढता येतील.

८. आशयानुसार दिलेल्या विशेष नोंदी करता येतील.

९. अवांतर वाचनातून तयार झालेल्या महत्त्वाच्या नोंदी घेता येतील.

१०. पाठाच्या संदर्भात वर्तमानपत्रे, नियतकालिके इत्यादी संदर्भाची माहिती त्या त्या पाठाला जोडून लिहिता येईल.

११. पाठाची शिकलेली सर्व माहिती नोंद घेतलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुन्हा आठवणे सुलभ होईल.

१२. अध्यायनाच्या या सवयीचा फायदा त्यांना पुढील इयत्तांमध्ये उपयोगी पडेल.

१३. एकाच पाठ्यपुस्तकात सर्व विषय असल्याने विषयांमधील सहसंबंध शोधणे सुलभ होईल.

१४. घटक चाचणी व सत्र परीक्षा या संदर्भाने नियोजन करणे सुकर होईल.

१५. पालकांना वर्गात काय शिकवले आहे हे समजेल.

Ww, nd
(कृष्णकुमार पाटील)

क्रमांक : ह/भाषा-भाषेतर/ १३८९ संचालक
दिनांक :०६/०६/२०२३ पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे -४

प्रतिलिपी :

प्र्त

१. मा. प्रधान सचिब, शालेय शिक्षण ब क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
२. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे ४११६ ००१

आवश्यक कार्यवाहीस्तव:

१. शिक्षण संचालक (प्राथमिक), आपल्या स्तरावरून इयत्ता १ ते ८ च्या सर्व शाळांतील शिक्षकांना विहीत यंत्रणेमार्फत अवलोकन व आवश्यक कार्यवाहीस्तब कळवणेस विनंती आहे.

२. विभागीय शिक्षण उपसंचालक (मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोल्हापूर , नाशिक, लातूर), यांनी
आपल्या स्तरावरून इयत्ता १ ते ८ च्या सर्व शाळांतील शिक्षकांना विहीत यंत्रणेमार्फत अवलोकन व आवश्यक
कार्यवाहीस्तव कळविणे.

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), सर्व जिल्हा परिषदा, महाराष्ट्र राज्य वांना सुचित करण्यात येते की,
उपरोक्त परिपत्रकानुसार आपल्या स्तरावरून सुयोग्य अंमलबजावणी बाबत सर्व संबंधितांना निर्देश देणे.

४. गटशिक्षणाधिकारी, सर्व पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य यांना सुचित करण्यात येते की, उपरोक्त परिपत्रकानुसार
आपल्या स्तरावरून सुयोग्य अंमलबजावणी बाबत सर्व संबंधितांना निर्देश देणे.

1 1
2 1

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *