सुदर्शन वांगदरे यांचा उत्कृष्ट BLO म्हणून गौरव

सुदर्शन वांगदरे यांचा उत्कृष्ट BLO म्हणून गौरव

25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो . या दिनाच्या निमित्ताने उत्तम कार्य करणाऱ्या BLO चा गौरव करण्यात येतो .

सुदर्शन वांगदरे हे वेवजी काटीलपाडा या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणुन कर्तव्यावर आहेत . ते मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कर्तव्य करीत आहेत .

स्वीप या कार्यक्रमात सुदर्शन वांगदरे यांनी 128 अ ज डहाणू मतदार संघात मतदारांची नोंदणी करणे , मतदार नाव व माहिती दुरुस्ती करणे , मतदार नावे वगळणे , इपिक आणि आधार संलग्न करणे ही प्रचंड मेहनतीने व निष्ठापूर्वक पूर्ण केली . या कामाचे कौतुक म्हणून सुदर्शन वांगदरे यांचा गौरव करण्यात आला . मतदार नोंदणी अधिकारी संजिता महापात्र, डहाणू निवडणूक अधिकारी अभिजित देशमुख यांनी वांगदरे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला . गौरव केल्याने वांगदरे यांनी आनंद व्यक्त केला व निवडणूक विभागाचे आभार मानले .

img 20230125 wa0003198756464286811956
सन्मान पत्र स्वीकारताना सुदर्शन वांगदरे
img 20230125 wa0004519144771461843081

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *