स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जन्मदिनाची
मुजरा माझा माता जिजाऊला* *घडविले तिने शूर शिवबाला* *साक्षात होती ती आई भवानीजन्म घेतला तिच्या पोटी शिवानी
*सिंदखेड.. विदर्भातील या लहान गावाचे नाव जगाला ठाऊक आहे. १२ जानेवारी १५९८ रोजी भारतीय संस्कृतीला संजीवनी देणाऱ्या स्वराज्य जननी जिजाबाईंचा इथे जन्म झाला.* *भारतीय इतिहासातील सर्वात वाईट हा कालखंड होता. देशाला कुतुबशाही.. आदिलशाही, मोगलशाहीने ग्रासले होते. त्यांच्या अत्याचाराने जनसामान्यांचे जीणे मुश्किल केले होते. सारे सत्व.. अस्मिता गमावून बसले होते. पण तलवारीच्या दडपशाहीला विरोधाचे धाडस कुणामध्ये नव्हते. असा वीर जन्मलाच नव्हता.* *अश्या या अत्यंत प्रतिकूलतेत जिजाबाईंनी बालवयातच याविरुद्ध लढण्याचा निर्धार केला. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितले, आणि बघितलेच नाही तर महापराक्रमी शिवाजी महाराजांकडून पूर्णत्वास नेले.* *जिजाबाई बालवयापासूनच धाडसी. त्यांचे वडिल लखुजी जाधव हे पण निजामशाहीचे सरदारच असल्याने सगळे राजकारण जिजाबाईना लक्षात येत होते. जिजाबाई स्वतः अत्यंत कर्तबगार होत्या. त्या धर्मसंस्कार शिक्षणासह तलवारबाजी.. घोडसवारी शिकल्या.* *शहाजीराजे भोसलेंशी त्यांचा विवाह झाला. लग्न होताच त्यांच्याकडे पुण्याची जहागीरी आली तेव्हा त्यांची न्यायदानाची.. दूरदृष्टीची जाणीव जनतेला झाली. त्यांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून जनतेला सुरक्षिततेची ग्वाही दिली. जनतेत आत्मविश्वास निर्माण केला. पराक्रमींचा गौरव करु लागल्या. पण राजद्रोहाला कठोर शासनही केले.* *शिवाजी राजांवर संस्कृती संस्कार करताना जिजाबाईनी त्यांना रामायण महाभारत कथा सांगितल्या. त्यांना राजनितीचे.. देशप्रेमाचे.. धर्मप्रेमाचे बाळकडू पाजले. युद्ध कौशल्य शिकविण्याची व्यवस्था केली. राजांना विश्वासू.. शूर आणि स्वराज्यप्रेमी साथीदार मिळवून देण्यात मोलाची मदत केली. राजांच्या हृदयात स्वराज्यप्रेम रुजविले. हिंदवी स्वराज्याचे महत्त्व सांगितले, म्हणूनच राजांनी लहान वयातच स्वराज्याचे तोरण बांधण्याचा पराक्रम केला. पूढे पराक्रमाने हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनाचे छत्रपती झाले.* *जिजामाता या शिवाजी राजांच्या प्रेरणास्त्रोत आणि आदर्श होत्या. प्रत्येक लढाईवेळी राजांच्या मार्गदर्शकही होत्या. शिवाजी राजांच्या पराक्रमात जिजाबाईंच्या आशिर्वादाचा.. मार्गदर्शनाचा फार मोठा वाटा होता. स्वराज्याविषयी लोकांमध्ये विश्वास जागृत केला. समाज धर्मशील रहावा यासाठी पुण्यात कसबापेठेत गणपती मंदिर उभारले. अठरापगड जातींना न्याय दिला.* *राजा म्हणून जनतेला न्याय कसा द्यावा.. अन्यायी मग तो कुणीही असो त्याला शासन कसे करावे.. अनिष्ट प्रथांना दूर कसे करावे याचे मार्गदर्शन जिजाबाई करायच्या. राजे मोहिमेवर असताना जिजाबाई प्रत्येक मावळ्याच्या घराची काळजी आत्मीयतेने घ्यायच्या.* *शुन्यातून आपल्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे असलेले सगळे गुण ही जिजाबाईंची मातृभेट होती, म्हणूनच 'राजमाता' असा जगभर जिजाबाईंचा सन्मान होतोय. शिवाजी महाराज छत्रपती झाले.. हिंदवी स्वराज्य निर्माण झाले ह्या ध्येयपूर्तीचा.. स्वप्नपूर्तीचा आनंद त्यांनी अनुभवला. जगात एखाद्या मातेचा राजमाता म्हणून सन्मान होणाऱ्या राजमाता जिजाबाई या एकमेव आहेत.* *हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणास्त्रोत.. स्वराज्य जननी राजमाता जिजाबाईंना जन्मदिनी मानाचा मुजरा.. त्रिवार वंदन.*🙏
🌹⚜️🚩⚜️⚔️⚜️🚩⚜️🌹
सह्याद्री सांगतो गं आई
गाथा शौर्याची
कृष्णा कोयना गाती गाणी
तुझ्याच किर्तीची
स्वराज्य जननी माय जिजाऊ
तुझा करारी बाणा
लीन सदा गं तुझ्याच चरणी
साऱ्यांच्या माना
जिजाई मानाचा मुजरा
आई घे मानाचा मुजरा
तुला हा मानाचा मुजरा
माय भवानीने भरली गं
तुझीच पावन ओटी
शिवसुर्याने जन्म घेतला
आई तुझ्या गं पोटी
संस्कारातून पुत्र घडविला
तू दिव्य तेजाचा
दृष्टांचा जो काळच ठरला
रक्षक रयतेचा
नीतीशील अन धर्मशील
जो महामेरू धैर्याचा
गौरव गाती दाही दिशा
तव अथांग कार्याचा
स्वाभिमान तू दिला आम्हां
न्यायधर्म ही दिला
शिवशंभुची बनली छाया
राष्ट्रधर्म जपला
आब राखली महाराष्ट्राची
तुझी कृपा गं सारी
निर्भीड केली मुले लेकरे
निर्भय अबला नारी
गुलामीतूनी मुक्त वाहिले
स्वराज्याचे वारे
तव किर्तीचे गाती पोवाडे
चंद्र सूर्य आणि तारे
🌹⚜️🌹🔆🚩🔆🌹⚜️🌹
गीत : दिनेश विजय जोशी ✍
संगीत : कृष्णा-देवा
स्वर : कृष्णा दिनेश जोशी
🎼🎶🎼🎶🎼 🎧
‼️जय जिजाऊ जय शिवराय‼️*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹* *१२.०१.२०२३*
⚜🌸⚜🌺🌻🌺⚜🌸⚜
