3 जानेवारी 2023 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जि प शाळा झाई मराठी याठिकाणी साजरी करण्यात आली. यावेळी झाई चे सरपंच श्री दुबळा यांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला .
सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने मुलींना वाचनाचे महत्त्व व सवयी व्हावी , वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळेतील मुलींना पुस्तके भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ईशी सर , पंधरे सर , ननवरे सर व ग्रामपंचायत सदस्य यांनी बालिका दिनाचे महत्त्व संगीतले .










