विषय-3 डिसेंबर जागतिक समान संधी दिन(दिव्यांग दिन) व जनजागृती पर समता सप्ताह कार्यक्रम साजरा करणेबाबत*
स्पर्धा आयोजित करणेबाबत महत्त्वपूर्ण सूचना खालील प्रमाणे:-
1. दिनांक-03/12/2022 रोजी सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्याची प्रभात फेरी काढताना जनजागृती पर घोषणा व घोषवाक्य फलक तयार करण्यात यावेत व सदर दिवसाचे विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून देण्याकरिता शाळा स्तरावर छोट्याशा कार्यक्रमाचे आयोजन करावे सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, गावचे सरपंच, पोलीस पाटील सन्माननीय पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांना आमंत्रित करावे. तसेच मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करावा
2.दिनांक-05/12/2022 चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार चित्र काढण्यास सांगावे व दुपार सत्रात चिकट काम/ठसे काम(थम पेंटिंग)स्पर्धेचेआयोजन करणे
3.दिनांक-06/12/2022 रोजी रांगोळी स्पर्धेचे शालेय व्हरांड्यात किंवा शालेय मैदानात आयोजन करावे
4.दिनांक-07/12/2022
रोजी शालेय पुस्तकातील पाठ वाचन स्पर्धेचे आयोजन करणे.व सदर स्पर्धेचा प्रति विद्यार्थी वाचन व्हिडीओ जास्तीत जास्त 5 मिनिटांचा व्हिडीओ तयार करावा.
5.दिनांक-08/12/2022
रोजी कविता किंवा देशभक्तीपर गीत स्पर्धेचे आयोजन करावे.सदर स्पर्धेचा प्रति विद्यार्थी कविता/गीत व्हिडीओ जास्तीत जास्त 5 मिनिटांचा व्हिडीओ तयार करावा*.
*6.दिनांक-09/12/2022
रोजी विद्यार्थी वेषभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे.याकरिता विद्यार्थी आवडीनुसार वेष परिधान करावेत*.
तलासरी तालुक्यातील जि प शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची क्षणचित्रे

































