डहाणू तालुकास्तरीय केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांची तंबाखुमुक्त शाळा या विषयावर प्रशिक्षण संपन्न.

दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद पालघर, पंचायत समिती डहाणू शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” डहाणू तालुकास्तरीय केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांची तंबाखुमूक्त शाळा या विषयावर प्रशिक्षणाचे “ आयोजन पद्मश्री जिव्या सोमा म्हसे सभागृह, पंचायत समिती डहाणू जिल्हा पालघर येथे आयोजित करण्यात आले.
जिल्हा परिषद पालघर चे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सौ. संगिता भागवत यांच्या मार्गदर्शनावरून डहाणू तालुक्यात तंबाखू मुक्त कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समिती डहाणू शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी वसंत महाले सरांनी सदर प्रशिक्षणाचे प्रास्ताविक करुन मार्गदर्शन केले . सलाम मुंबई फाउंडेशन चे प्रतिनिधी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी आवश्यक ९ निकष विविध उदाहरणे देत , प्रत्यक्ष फोटो दाखवून स्पष्ट केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले .
Tobacco Free School Application ( टोबॅको फ्री स्कुल ॲप) याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी डहाणू तालुक्यातील विस्तार अधिकारी सौ. माधवी तांडेल मॅडम, २६ केंद्रातील २५ केंद्र प्रमुख, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. शेवटी सर्वांना तंबाखुमुक्तची शपथ देण्यात आली व सदर प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली. अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा समन्वयक श्री मिलिंद पाटील यांनी दिली.