बालदिनानिमित्त पारगाव केंद्रस्तरीय चित्रकला स्पर्धा संपन्न



दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद पालघर, जिल्हा परिषद केंद्रशाळा पारगाव तालुका जिल्हा पालघर, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त केंद्रस्तरीय चित्रकला स्पर्धा २०२२ चे आयोजन जिल्हा परिषद केंद्र शाळा पारगाव तालुका जिल्हा पालघर येथे आयोजित करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ व व्यसनमुक्ती या विषयावर चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा पारगाव, सोनावे, तांदुळवाडी, बोरीचा पाडा, नांगरमोड, उंचावली, घरतपाडा, नावझे डोंगरी, गिराळे शाळांच्या २३५ विद्यार्थी सहभाग घेतला होता.

चित्रकला बक्षीस वितरण समारंभ ला प्रमुख पाहुणे पारगाव केंद्राचे केंद्र प्रमुख प्रभाकर भोईर, सलाम मुंबई फाउंडेशन चे प्रतिनिधी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा समन्वयक श्री मिलिंद रूपचंद पाटील, पारगाव शाळेतील मुख्याध्यापक नितीन राऊत, इतर शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. साईदत्ता बिल्डकॉन स्पेशालिटीज प्रा. लि. चे संचालक महेश शांताराम भाने यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले होते.
यावेळी लहान गटात प्रथम क्रमांक मनस्वी पाटील जिल्हा परिषद पारगाव, द्वितीय क्रमांक अनुष्का थोडे जिल्हा परिषद नावझे डोंगरी, तृतीय क्रमांक श्रृती दिवा जिल्हा परिषद खोणपाडा, उत्तेजनार्थ प्राची लिलका जिल्हा परिषद नांगरमोड, उत्तेजनार्थ धनेश दळवी जिल्हा परिषद उंचावली तर मोठ्या गटांत प्रथम क्रमांक तृप्ती सरवैया जिल्हा परिषद केंद्र शाळा पारगाव, द्वितीय क्रमांक मयंक मोरे जिल्हा परिषद तांदूळवाडी, तृतीय क्रमांक प्रांजल पाटील जिल्हा परिषद पारगाव, उत्तेजनार्थ संजय काटेला जिल्हा परिषद सोनावे, उत्तेजनार्थ उज्वला मालकरी जिल्हा परिषद बोरीचापाडा या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सांगता तंबाखू मुक्त ची शपथ घेऊन करण्यात आली.