मिलिंद पाटील यांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार

दिनांक ठाणे मंगळवार ८ नोव्हेंबर २०२२ रोजी तृप्ती बॅक्चेट, ४ था मजला, एम. एच. हायस्कूल, शिवाजी पथ, तालुका जिल्हा ठाणे पश्चिम या ठिकाणी समन्वय प्रतिष्ठान आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ आयोजित करण्यात आले होते. यावेळी शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्यातील भरीव योगदानाबद्दल कल्याण तालुक्यातील श्री. आर. के. मिश्रा हिंदी विद्यालय कल्याण पूर्व जिल्हा ठाणे शाळेतील शिक्षक श्री. मिलिंद रूपचंद पाटील यांना समन्वय प्रतिष्ठान आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे आमदार कोकण पदवीधर मतदार संघ चे अॅड. मा. श्री. निरंजन वसंत डावखरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
श्री. आर. के. मिश्रा हिंदी विद्यालय कल्याण येथील शाळेत विज्ञान प्रदर्शन, क्रिडा, विविध प्रकारचे स्पर्धा, तंबाखुमूक्त शाळा, शैक्षणक्षेत्रातील उल्लेखनीय व वैशिष्ट्ये पूर्ण कार्याची दखल घेऊन समन्वय प्रतिष्ठान या संस्थेकडून २०२२ चा मिलिंद रूपचंद पाटील यांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. याबद्दल शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी, पालक मित्रपरिवार सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.