महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
१७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे – ०१ Website : www.mscepune.in _Email : mscescholarship@gmail.com दूरध्वनी क्र. ०२०-२६१२३०६६/६७ महात्त्वाचे / कालमर्यादित
जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२२/506) दिनांक :-02/11/2022
प्रति.
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, २. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व. ३. शिक्षण निरीक्षक, (दक्षिण, पश्चिम व उत्तर). ४. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका सर्व. विषय :- शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व इ.८ वी २०२३ साठी मनपा / जि. प. सेस फंडातून शाळा संलग्नता शुल्क
व विद्यार्थी परीक्षा शुल्क भरणेबाबत…
संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ चे नियोजन,
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ साठी विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यास सुरुवात होणार असल्यामुळे ज्या व्यवस्थापनांना त्यांच्या अधिनस्त शाळांमधील इ. ५ वी व इ. ८ वी मध्ये शिकत असलेल्या व शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क तसेच सहभागी होणाऱ्या शाळांचे शाळा संलग्नता शुल्काचा भरणा मनपा / जि. प. सेस फंडातून करावयाचा आहे त्यांनी उचित मान्यता घेऊन तसे परीक्षा परिषदेच्या mscescholarship@gmail.com या ईमेल आयडीवर तात्काळ कळवावे. शासन निर्णय दि. ११/११/२०२१ नुसार इ. ५ वी व इ. ८ वी साठी परीक्षा शुल्काची गणना खालील प्रमाणे आहे.
शासन निर्णय दि. ११/११/२०२१ नुसार।
सुधारीत शुल्क अ.क्र. शुल्क
बिगरमागास | मागास व दिव्यांग
विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांसाठी शाळा संलग्नता शुल्क १. प्रवेश शुल्क – रु.५०/
रु.५०/
रु. २००/- राहील. २. परीक्षा शुल्क – रु.१५०/
रु.७५/रु.२००/
रु.१२५/शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ साठीची अधिसूचना लवकरच संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने सदर बाबत तात्काळ कार्यवाही करावी.
एकूण
2160PITOM)
(शैलजा दराडे,3011020m)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे – ०१.
प्रत माहितीसाठी –
१. विभागीय शिक्षण, उपसंचालक, सर्व, २. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व.