माणसं मनातली…..

माणसं मनातली……

मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.
सहवासातील माणसाचं देखील असंच असतं.

काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात.
तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेच…

चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं…

शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं…

शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं.
माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते…

म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो…

आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं!!

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई…
ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.

आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?
नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत…

कदाचित, पुन्हा भेटतील ,न भेटतील?

✍️व.पु.काळे साभार फेसबुक वरून

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *