महिला बचत गटांना  ” तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ दुष्परिणाम “विषयावर मार्गदर्शन संपन्न

महिला बचत गटांना  ” तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ दुष्परिणाम “विषयावर मार्गदर्शन संपन्न

महिला बचत गटांना  ” तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ दुष्परिणाम “विषयावर मार्गदर्शन संपन्न

डॉन बॉक्सो विकास सोसायटी आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य  यांचे संयुक्त विद्यमाने तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ या विषयावर मार्गदर्शन  चे आयोजन डॉन बॉक्सो विकास सोसायटी, महानगर गॅस मार्फत महिला बचत गटांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ या विषयावर मार्गदर्शन वडाळा मुंबई येथे करण्यात आले.  

1667029100738619 0

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नशाबंदी मंडळाचे कार्यक्रम अधिकारी  श्री मिलिंद रूपचंद पाटील  हे उपस्थित होते.  डॉन बॉक्सो विकास सोसायटी चे मुंबई समन्वयक सुरेखा मॅडम आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस वर्षा विद्या विलास  यांच्या मार्गदर्शनावरून महिला बचत गटांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ या विषयावर मार्गदर्शन करण्यात  आले होते. यावेळी  महिलांनी  तंबाखू मतलब खल्लास !, हम सब एक है, तंबाखू जहर है !, तंबाखूचे व्यसन कॅन्सरला निमंत्रण!, एकमेकांची साथ देवूया तंबाखूचा नाश करूया !, तंबाखू सोडा आयूष्य जोडा ! अशा प्रकारे  घोषणा देण्यात आल्या.  डॉन बॉक्सो विकास सोसायटी चे प्रत्येक विभागातील समन्वयक विनोद हिवाळे, कविता कांबळे, जयश्री खरात, बंसती सिंग उपस्थित होते.

1667029095456821 1

 मिलिंद पाटील यांनी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ या विषयावर मार्गदर्शन करताना माणसास शारिरीक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते (  गुटखा, तंबाखू, सिगारेट,  ) जी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतात अश्या सर्व व्यक्ती इतर नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करण्यास कारणीभूत ठरतात हे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकार बंधित करते. सदर मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करिता तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायदा 2003 कलम 4 च्या अंमलबजावणीसाठी कार्यवाहय कराव्यात.

1667029086049667 2

 जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार तंबाखूच्या सेवनामुळे 8.40 कोटी टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात उत्सर्जित केला गेला आहे. जवळपास 220 कोटी लिटर पाण्याचा वापर झाला आहे आणि 60 कोटी वृक्षतोड झाली आहे. सध्या जगभरात तंबाखू वापरल्यामुळे होणाऱ्या अंकाली मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. तंबाखू हा कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग यासारख्या आजारासाठी प्रमुख कारणीभूत घटक आहे. भारता मध्ये तंबाखू मुळे दरवर्षी 13 लाख लोक मृत्युमुखी पडतात व आजस्थितीला 27 कोटी लोक तंबाखूच्या विळख्यात सापडले आहे. यावेळी प्रत्येक विभागात ३० – ४० महिला उपस्थित होत्या. हे मागदर्शन १० विभागात घेण्यात आला होते. अशी माहिती नशाबंदी मंडळाचे कार्यक्रम अधिकारी  श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *