माकुणसार येथील राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत व्यसनमुक्ती चे पोस्टर प्रदर्शन आणि शपथ संपन्न
दि. २३ ऑक्टोंबर २०२२ रोजी माकुणसार स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा २०२२ चे आयोजन माकुणसार, तालुका जिल्हा पालघर येथे करण्यात आले होते. या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत व्यसनमुक्ती चे पोस्टर प्रदर्शन आणि व्यसनमुक्ती ची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील हे उपस्थित होते. सहभागी स्पर्धकांनी तंबाखू मतलब खल्लास !, हम सब एक है, तंबाखू जहर है !, तंबाखू सोडा आयूष्य जोडा ! या स्पर्धेत घोषणा देण्यात आल्या.


मिलिंद पाटील यांनी व्यसनांमुळे माणसास शारिरीक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते ( दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट, अमली पदार्थ ) चे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. या वेळी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ चे अध्यक्ष बोईसर विधानसभा सदस्य मा. आ. राजेश रघुनाथ पाटील उपस्थित होते. यांनी स्पर्धातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभेच्छा मागदर्शन केले व पारितोषिक वितरण समारंभ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी बोईसर विधानसभा सदस्य मा.आ. राजेश पाटील, माकुणसार स्पोर्ट्स फाउंडेशन चे अध्यक्ष मा. मनिष ठाकुर यांना कलम 47 ची फ्रेम आणि महामानवाच्या विचारांचे पुस्तक भेट देण्यात आली. यावेळी मॅरेथॉन स्पर्धा चे स्पर्धक, माकुणसार स्पोर्टस फाउंडेशन चे सदस्य, स्वयंसेवक, माकुणसार ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी पारगाव शाळेतील मुख्याध्यापक राऊत सर यांनी व्यसनमुक्तीची शपथ स्पर्धक, ग्रामस्थ यांना देण्यात आली. अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी दिली आहे.